कोरची(Gadchiroli):- मानव विकास कार्यक्रम गडचिरोली व महिला आर्थिक विकास महामंडळ गडचिरोली यांच्या संयुक्त विघमाने तेजोमय लोकसंचालित साधन केंद्र वडसा कार्यक्षेत्रातील कोरची येथे सुसंकल्प दुध संकलन केंद्र कोरची येथे दिनांक 22/1/2025 ला मा.श्री. प्रफुल भोपे जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान श्री. प्रविण डोंगरे जिल्हा समन्वयक मा.श्री.सचिन देवतळे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ गडचिरोली यांनी दुध संकलन केंद्राला भेट दिली व प्रकल्पाची पाहणी करून सुसंकल्प दूध संकलन केंद्राचे व गटाच्या 11 महिलांशी संवाद साधला यावेळी श्री मा. राष्ट्रपाल नखाते पत्रकार देशोन्नती उपस्थित होते.
सुसंकल्प दूध संकलन केंद्राचे व गटाच्या 11 महिलांशी संवाद साधला
श्रीमती कुंन्दा मामीडवार व्यवस्थापक तेजोमय लोक संचालित साधन केंद्र वडसा, गटाच्या अध्यक्षा सोनिया सहारे, उत्तरा अंबादे, कांचन भैसारे, विद्या भैसारे, केशर अंबादे, सुमन जांभुळकर, मानकुबाई भैसारे, शकुंतला अंबादे, अनुसया खरोले, मितला सातार, विमल भैसारे, सहयोगीनी रिना जांभुळ कर, सीआरपी बसंती नैताम, सुरेखा शेंडे उपस्थित होत्या. पुढे व्यवसायाची वाढ करण्यासाठी मार्गदर्शन करून पशु वाढविण्यासाठी संबंधी मार्गदर्शन केले.