बँकेला राज्य स्तरावरील कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ठ जिल्हा बँक पुरस्कार जाहीर
गडचिरोली (Gadchiroli District Bank) : दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसीएशन मुंबईच्यावतीने सन २०२३-२४ या वर्षाचा कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नुकताच जाहीर झालेला आहे. सदर पुरस्कार वितरण समारंभ मुंबई येथे मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत होणार आहे. यामुळे (Gadchiroli District Bank) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला आहे.
दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Gadchiroli District Bank) मागील ३९ वर्षापासुन बँकेच्या ५७ शाखांच्या माध्यमातुन जिल्ह्यातील दुर्गम व अती दुर्गम भागातील लोकांना बँकींग सुविधा पुरवित असुन बँकेने ग्राहकांकरीता मोबाईल बँकींग, आय.एम.पी.एस. व यु.पी.आय. ई. अत्याधुनीक सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थीक निकषाला पात्र राहुन गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इंटरनेट बँकींग सुविधेचा परवाना प्राप्त झाला आहे. इंटरनेट बँकींग परवाना प्राप्त झालेली महाराष्ट्रातील पहिली व देशातील आठवी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठरली आहे.
आजमीतीस गडचिरोली जिल्ह्यात बँकेच्या ५७ शाखा पर्यंत विस्तार झालेला असुन, Gadchiroli District Bank) बँकेच्या जिल्ह्यातील अतीदुर्गम भागातील कोटगुल ते विठ्ठलरावपेठा या भागात बँकेच्या शाखा कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे हेडरी सारख्या अतीदुर्गम भागात बँकेने ग्राहकांना ए.टी.एम. सुविधा सुरु केलेली आहे. बँक ३९ ए.टी.एम. च्या माध्यमातुन जिल्ह्यातील ४,३०,००० खातेदार बँकेशी जुळलेले असुन यावरुन बँकेची विश्वसनीयता दिसुन येते.
दि. ३१ मार्च २०२५ च्या आर्थीक स्थितीवर बँकेने ३८८१ कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केलेला असुन बँक ४००० कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल करीत आहे. बँकेचा ग्रॉस एन.पी.ए. ०.९५ टक्के असुन बँकेचा नेट एन.पी.ए. शुन्य टक्के आहे. महाराष्ट्रातील ३१ जिल्हा सहकारी बँकामध्ये सर्वात कमी एन.पी.ए. चे प्रमाण असलेली एकमेव जिल्हा बँक आहे. यावरुन बँकेची आर्थीक सक्षमता दिसुन येत आहे.
गडचिरोली जिल्हा बँकेने मागील ४० वर्षात केलेले उल्लेखनीय कार्य व प्राप्त झालेले राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडुन इंटरनेट बँकींगचा परवाना प्राप्त झालेली महाराष्ट्रातील पहिली व देशातील आठवी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. बँकेला कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष प्रंचित अरविंद पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे सर्व संचालक व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी सदर पुरस्काराचे श्रेय जिल्ह्यातील बँकेच्या सर्व खातेदार, जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते, महिला बचत गटांचे सर्व सदस्य व सर्व हितचिंतक यांना दिलेले असुन त्यांचे अभिनंदन करुन आभार मानले आहे.
अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
एकुण १२ वेळा राज्यस्तरीय ‘वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट (Gadchiroli District Bank) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ पुरस्काराने सन्मानीत. एकुण ८ वेळा राष्ट्रीय स्तरावरील ‘बँको ब्ल्यु रिबन’ पुरस्काराने सन्मानीत. महाराष्ट्र शासनातर्फे ‘सहकार निष्ठ’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत. नाबार्डतर्फे वित्तीय समावेशन कार्यक्रमाअंतर्गत उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत झाली आहे. याशिवाय विविध पुरस्कारांंनी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सन्मानित करण्यात आले आहे.




