गडचिरोली (Gadchiroli) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळा (Higher Secondary Examination Board) च्यावतीने फेब्रुवारी/ मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल (10th Result) आज १३ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन (Online) जाहीर करण्यात आला. यामध्ये गडचिरोली जिल्हयाचा निकाल ८२.६७ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी २०२४ मध्ये दहावीचा निकाल ९४.६७ टक्के लागला होता. यावर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत दहावीच्या निकालात तब्बल १२ टक्के घट झाली आहे. विशेष म्हणजे यावर्षी दहावीच्या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली आहे.
१० वीच्या परीक्षेसाठी गडचिरोली जिल्ह्यातून ७३७१ मुले, ६८४५ मुली असे एकंदरीत १४२१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७१५० मुले , ६७२२ मुली असे १३८७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये ५५७९ मुले, ५८८९ मुली असे ११४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या यशाची टक्केवारी ७८.०२ तर मुलींच्या यशाची टक्केवारी ८७.६० टक्के एवढी आहे.