गडचिरोली (Gadchiroli fire ) : गडचिरोली पासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या नागपूर -गडचिरोली (Gadchiroli fire) मार्गावर वसा येथील सद्गुगुरु पेट्रोल पंपावर अचानक ट्रकला आग लागल्याने बर्निंग ट्रकचा (The Burning Truck) थरार अनुभवास आला.
“दि बर्निंग ट्रक”, मोठा अनर्थ टळला
वसा येथील सद्गुगुरु पेट्रोल पंपावर (The Burning Truck) एका ट्रक चालकाने ट्रक उभा केला. ट्रक ड्रायव्हरच्या इंजिन गरम झाल्याचे लक्षात येताच चालक व क्लीनर दोघेही ट्रकच्या खाली उतरले व ट्रकने अचानक पेट घेतला. यावेळी (Petrol pump) पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी धावपळ करीत ट्रकची आग विझवण्याचा प्रयत्न केला. (Gadchiroli fire) गडचिरोली शहर अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असताना अग्निशमन गाडी पोहोचू शकली नव्हती. सुदैवाने ट्रक चालकांनी ट्रक हा पेट्रोल पंपापासून थोड्या लांब अंतरावर उभा केल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा अख्खा पेट्रोल पंपच आगीच्या भक्षस्थानी सापडला असता. यावेळी (Petrol pump) पेट्रोल पंपावर काही वाहने देखील उभी होती.