आष्टी (Gadchiroli heavy rain) : गडचिरोली जिल्ह्याच्या मध्यभागी असलेल्या समोरची तालुके अंतर्गत येत असलेल्या आष्टी गावामध्ये सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास चक्रीवादळाने संपूर्ण आष्टी वासियांचं जन जीवन काही वेळा पुरता विस्कळीत केले होते. आष्टी येथे (heavy rain) चक्रीवादळाने महावितरण विभागाचे 11 ते 13 पोल अर्धे पूर्ण वाकडे तुटून पडलेले आहे आणि महत्त्वाचा विशेष म्हणजे आष्टी येथील (Mahavatran) महावितरणाचा भोंगळ्यात कारभार सुरू आहे.
महावितरण विभागाने (heavy rain) पावसाळ्यापूर्वी मेंटेनेस ची कामे पूर्ण करायला हवी होती. मात्र ती कामे पूर्ण करण्यात आलेली नाही आणि आष्टी महावितरणाचे इंजिनीयर साहेब चंद्रपूर वरून येणे जाणे करीत असतात कधी इथे थांबतात तर कधी चंद्रपूरला जात असतात आणि त्यानंतर लाईट गेली. तरी माहित राहत नाही. महावितरण विभागाने आष्टी येथे सेपरेट फिडरची निर्मिती केली आहे 30 40 लाख रुपयाचे आष्टी येथे सेपरेट फीडर आहे मात्र आष्टी येथील सेपरेट फिडर असून सुद्धा मेंटेनेस साठी मनुष्यबळ नसल्याने आष्टी येथील महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेला आहे. मात्र (Mahavatran) महावितरण विभागात दोन-चार कर्मचारी आहेत आणि जे कर्मचारी आहेत. ते संपूर्ण आष्टी येथील लाईन चालू ठेवण्याकरिता कसरत करून राहिलेले आहेत या कसरतीत एखाद्याचा जीव गेल्यास कोण जबाबदार राहील आष्टीच्या चामोर्शी रोड येथील न्यू सुलतान ढाब्याचे लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहेत. यावेळेस नुकसानी मध्ये न्यू सुलतान डब्याचे मालक हे त्याच ठिकाणी राहत असतात त्या (heavy rain) चक्रीवादळामध्ये त्यांच्या मुलीला सुद्धा दुखापत झालेली आहे.
यामध्ये निलो फारुख शेख,फारुख शेख,रिया फारुख शेख सभा जावेद खुरेशी,मारियम अब्दुल सईद शेख हे त्याच ठिकाणी होते. त्यामध्ये त्यांच्या धाब्यावरील टीव्ही, फ्रिज, कुलर, सिलिंग फॅन, गैस, शेगडी वाशिंग मशीन, शोकेस आईस्क्रीम फ्रिज, डबल डोर फ्रिज, सिंगल वाला फ्रिज, बेड 3,दुकानं ठेला 1 लाखाचा तो पूर्ण उडून गेला. टेबल खुर्ची, मिक्सर होम थेटर आणि पूर्ण अन्न,तांदूळ गहू तेल पिपा, हॉटेलमध्ये लागणारे सर्व साहित्य उडून गेलेले आहेत एक ते दीड लाख रुपयाचे साहित्य अस्त्यवस्थ झालेले आहे. तसेच (Mahavatran) महावितरणाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी मेंटेनन्स चे काम झाले असते. आज महावितरणाला सुद्धा लाखो रुपयांचा फटका बसला नसता. आष्टी अल्लापल्ली महामार्गावरील दीपक इंटरप्राईजेस यांच्या दुकानाचे सुद्धा भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यांच्या मालाची सुद्धा अस्त व्यस्त झालेली आहे.