गडचिरोली(Gadchiroli):- आंवान हायस्कूल आंधळी फाट्याजवळ शेळ्यांचा चारा करीता डारा तोडण्याचा निमीत्याने झाडावर चढलेल्या व्यक्तीला झाडाचा फांदीला स्पर्श करीत गेलेल्या विद्यूत वाहीनीचा धक्का(Electric shock) बसल्याने तो झाडावरून खाली पडत मृत्यु(death) झाल्याची घटणा आज दि ३० एप्रील मंगळवार रोजी सकाळी १०.३० वाजेचा सूमारास घडली.
विजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यु
तालूक्यातील वाघेडा येथील मृतक तुलाराम मुखरू राऊत वय ४४ हा काही कामानिमीत्य कूरखेडा-देसाईगंज मार्गालगत असलेल्या आंधळी फाटा येथे आला होता. यावेळी रस्ता लगत असलेल्या उमरीचा झाडावर शेळ्यांचा चारा करीता डारा तोडण्यास तो चढला होता. मात्र येथे त्याला जोरदार विजेचा धक्का (Electric shock) बसल्याने खाली कोसळत जागीच त्याचा मृत्यु झाला. या झाडाचा वरून ११ केव्ही विद्यूत वाहीनीचे तार गेलेले आहेत व तारांचा स्पर्श हा झाडाचा फांद्याला होत आहे. त्यामूळे झाडाला करंट येत त्या धक्क्यानेच त्याचा मृत्यु झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतआहे. मृतक हा आचारीचे काम (chef’s job) करीत होता. त्याचा मागे वृद्ध आई-वडील, पत्नी तसेच ४ अविवाहित मूली आहेत.