– २ दिवसांत वेळापत्रक जाहीर आयटीआयचे प्रवेश सोमवारपासून
देशोन्नती वृत्तसंकलन
गडचिरोली (Gadchiroli): आयटीआयचे प्रवेश गंदा ३ जूनपासून ऑनलाईन स्वरूपात होणार आहेत. या प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक येत्या दोन दिवसांत जाहीर केले जाणार आहे. यावर्षी ४१८ शासकीय आयटीआयमध्ये ९२ हजार ३६४ व ६०८ अशासकीय आयटीआयमध्ये ५६ हजार २०४ अशा एकूण १ लाख ४८ हजार ५६८ जागांवर प्रवेश होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाअंतर्गत असलेल्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फ ही प्रवेशाची प्रक्रिया संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्थात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत, यावर्षी प्रवेशासाठी उपलब्ध व्यवसायांची संख्या ८० असून त्यामध्ये पारंपारिक इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक मोटर व्यईकल, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, वेल्डर यासारख्या लोकप्रिय व्यवसायांबरोबरच गतवर्षी एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर तसेच ड्रोन टेक्निशियन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या व्यवसायांचा समावेश करण्यात आलेला आहे.
– एकूण १ लाख ४२ हजार ५०० जागांवर १ लाख २८ हजार १७९ प्रवेश झालेले होते
गतवर्षी राज्यात ४१७ संस्थात १ लाख ४२ हजार ५०० जागा उपलब्ध होत्या. प्रवेशाच्या सहा फेच्या झाल्या होत्या. शासकीय आयटीआय मधील ९३ हजार ४८४ जागावर ८९ हजार ३८३ प्रवेश झाले होते तर खासगी आयटीआयमध्ये ( Private ITI ) ४९ हजार १६ जागापैकी ३५ हजार ६६९ जागावर प्रवेश झाले होते. एकूण १ लाख ४२ हजार ५०० जागांवर १ लाख २८ हजार १७९ प्रवेश झालेले होते. यंदा काय बदल ? विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना मूळ कागदपत्रे सादर करुन आपला प्रवेश कन्फर्म करावा लागतो. त्यामुळे आता अर्ज भरताना प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी नजीकच्या कोणत्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (Industrial Training Institute) उपस्थित राहणार हे सांगावे लागणार आहे. त्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातील पाठपुरावा त्या आयटीआयची यंत्रणाही करणार आहे.