कारला (Gadchiroli):- चांदुर रेल्वे तालुक्यातील चिरोडी जंगलातील कारला ते चिरोडी मार्गावर अज्ञात वाहनाची धडक बसून अंदाजे आठ महिने वय असलेले बिबट्याचे बछडे ठार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज शनिवारी (7 डिसेंबर) पहाटे दरम्यान घडली,या घटनेसंदर्भात माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत बछड्याचा मृत्यू
चांदुर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चिरोडी बिट मधील जंगलातून कारला चिरोडी मार्ग जातो. चिरोडी जंगलात वाघांचे (Tiger) वास्तव्य आहे. आज पहाटे दरम्यान मादी बिबट व तिचे बछडे रस्ता ओलांडत असताना रसत्यावरू भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाची धडक बछड्याला बसली, बछडे या धडकेत पडून जागेवरच मृत्युमुखी पडल्याचे येथे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले. सकाळच्या अंधारात अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेमुळं बिबट्याचं पिल्लू रस्त्याच्या मधातच मृत अवस्थेत पडलं. पहाटे या पिल्लाच्या आईनं आपल्या बाळाचं मृत शरीर रस्त्याच्या कडेला आणून ठेवल्याचं या परिसरातील ग्रामस्थांनी पाहिलं, असा दावा त्यांनी केला. शनिवारी पहाटे चिरोडी आणि कारला येथील ग्रामस्थांची घटनास्थळी गर्दी झाली असता घटनास्थळावरुन मृत बिबट्याची आई जंगलात पळाली.
नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे (Forest Department)पथक सकाळी सात वाजता चिरोडी कारला मार्गावर असणाऱ्या घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यावर मृत बिबट्याला अंत्यसंस्कारासाठी वडाळी येथील बांबू उद्यान परिसरात आणण्यात आलं. यावेळी चांदुर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी भानुदास पवार, चिरोडी वनपाल प्रकाश करे, चौकीदार धनराज गवई, वाहनचालक अंकुश खेकाडे, सामाजिक वनीकरण चौकीदार भिकू जाधव उपस्थित होते.
परिसरातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन: बिबट वाघाचे बछडे मृत्युमुखी(deathly) पडल्यामुळे त्याची आई चवताळली आहे,ती तिच्या बछड्याला शोधत असेल त्यामुळे परिसरातील नागरिकांना जंगल भागातुन सांभाळून जावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी भानुदास पवार यांनी केले