आत्मसमर्पित नक्षल कमांडर निरिंगसाय उर्फ गोपी मडावीची संतप्त प्रतिक्रिया
गडचिरोली (Gadchiroli Naxalite Chalval) : नक्षलवादी चळवळीत अनेक वर्ष होतो. आता आता बंदुकीच्या नोकावरची रक्तरंजित ठोकशाही सोडून शासनाच्या अभिनव उपक्रमाचा एक भाग असलेला आत्मसमर्पण योजनेतून आत्मसमर्पित करून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आलो. लोकशाही मार्गाने आपल्या गावातील नागरिकांच्या मुलभूत सुविधा व विकास कामांसाठी लढणे गुन्हा आहे का? असे म्हणत मग नक्षलवाद आणि कोरचीची पोलीस यांच्यात फरकच काय असा संतप्त सवाल आत्मसमर्पित नक्षल कमांडर निरिंगसाय उर्फ गोपी मडावीने उपस्थित केला आहे.
एक दशकाआधी दंडकारण्यात बंदुकीच्या जोरावर बदल घडवण्याची ‘ठोकशाहीत असलेल्या नक्षलवादी या असामाजिक संघटनेत सहभागी होऊन अनेक हिंसक कारवाया केल्या होत्या. मात्र, या हिंसक कारवायातुन सर्व सामान्य माणसाला न्याय देऊ शकत नाही याचा मला साक्षात्कार झाला आणि नक्षलवाद सोडून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात दाखल झालेला निरिंगसाय उर्फ गोपी मडावी हा आता मागील दोन दिवसांपासून अत्यंत हतबल झालेला आहे.
तब्बल १० वर्षे नक्षल चळवळीत (Gadchiroli Naxalite Chalval) सक्रिय होता. या काळात त्यांनी नक्षलवाद्यांच्या विविध हिंसक कारवायांमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, हिंसेच्या मार्गाने आदिवासींचा विकास शक्य नाही, हे उमजल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेत त्यांनी हिंसेचा मार्ग कायमचा त्यागला आहे. आत्मसमर्पण होण्यापूर्वी बंदुकीच्या नोकावर प्रशासनासह शासनाला ‘सळो की पळो’ करून सोडले होते. नक्षल्यांची अवलंबलेली ही ठोकशाही सोडून मुख्य प्रवाहात आल्यानंतरही त्याच्या समस्या आजही ‘जैसे थेच’ असून संपूर्ण जगातील उत्कृष्ट लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशात देखील हाच प्रत्यय येत असून इथे महाराष्ट्र शासनाचे कोरचीचे पोलीस नव्हत्याचे होते करून खोट्या गुन्ह्यात अडकवून व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करित असल्याचा विदारक अनुभव दोन दिवसांपासून आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची नगरपंचायत मध्ये बांधकाम,अनियमितता, भ्रष्टाचाराच्या चौकशी यासह कोरचीच्या नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, दर्जेदार रस्ता, स्वच्छता व वीज या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वप्रथम तहसिल कार्यालयावर मोर्चा, त्यानंतर आमरण उपोषण मग जिल्हाधिकारी यांना रितसर निवेदन अशी स्टेप बाय स्टेप जनतेच्या सार्वजनिक हितार्थ वैधानिक आंदोलनातून उभारलेल्या लढ्याबाबत स्थानिक प्रशासन दखल घेत नसल्याने दि.१३ जानेवारीला प्रशासनासह शासनाचेही लक्ष वेधण्यासाठी कुठलीही अनुचित घटना घडू न देता, इजा न पोहोचवता, शासकीय नुकसान न करता,अतिशय शांततेच्या मार्गाने आंदोलनाचाच एक भाग समजल्या जाणाऱ्या कुलूप लावून आंदोलन करण्यात आले.यावेळी नगर पंचायत कार्यालयाला जवळपास पंचेविस पोलिसांचा चोख बंदोबस्तात त्यांच्याच समक्ष वैधानिक आंदोलन केले होते.आंदोलनावेळी कुठल्याही पोलिसाने आम्हाला कुलूप लावू नका असे हटकले नाही, अथवा मज्जाव केला नाही.
आंदोलक अतिशय शांतपणे कार्यालयाला कुलूप लावत असताना घटनास्थळी असलेले पोलीस संपूर्ण घटना आपल्या मोबाईलच्या कॅमेरा मध्ये कैद करण्यात तल्लीन होते.संपूर्ण घटनाक्रम पोलीसासमक्ष घडली असताना काही निवडक आंदोलकांवरच मुख्याधिकारी यांची तक्रार न घेता ज्या कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून तक्रार नोंदवून घेतली होती. तक्रारदाराच्या दोन वेगवेगळ्या तक्रारी होत्या. परंतु पोलिसांनी त्यांच्या सोयीनुसार तक्रार करवून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या या (Gadchiroli Naxalite Chalval) आंदोलनात पत्रकार,सामाजिक व राजकीय पक्षांशी निगडित असलेल्या आंदोलकाचा प्रामुख्याने समावेश होता.यात सन २०१४ मध्ये नक्षलवादी चळवळीत भरकटलेला तसेच हिंसाचार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परत आलेल्या आत्मसमर्पित नक्षल कमांडर निरिंगसाय उर्फ गोपी मडावी यांचाही प्रामुख्याने समावेश आहे. कोरची नगर पंचायत कार्यालयाला कुलूप लावण्याची संपूर्ण घटना ही कोरची पोलिसांसमक्ष घडली आहे. नगर पंचायतीच्या आर्थिक अनियमितता व भोंगळ कारभाराच्या तसेच मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निरिंगसाय उर्फ गोपी मडावी सारखा आत्मसमर्पित नक्षल कमांडर लोकहितार्थ वैधानिक आंदोलनात सहभागी झाला होता.याचे ते प्रत्यक्षदर्शी होते.
अटक करण्यात आलेले पाचही आंदोलक हे पत्रकार ,विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांशी निगडित आहेत. आंदोलक हे स्थानिक व प्रतिष्ठित नागरिक होते. नगर पंचायतीच्या कार्यालयास कुलूप लावून झाल्यानंतर सगळे आंदोलनकर्त्यांनी पोलीस स्टेशन गाठून रितसर तक्रार केली होती. ही तक्रार घेण्यास नकार दिला. नेहमी प्रमाणे व नियमानुसार पाच आंदोलकांना रात्री उशिरा पर्यंत घरी जाण्यासाठी सोडू शकले असते. आंदोलकांची तक्रार व नगर पंचायत येथील कर्मचाऱ्यांची तक्रार या दोन्ही तक्रारी चौकशीत ठेवून निःपक्ष व पारदर्शी चौकशी करु शकले असते.
परंतु तसे न करता , एकतर्फी गुन्हा दाखल करून लांबलचक कथानक तयार करून कुख्यात आरोपी प्रमाणे लांबलचक गुन्हे दाखल केले. पोलीस एवढ्यावरच थांबले नाहीत तर पीसीआरची मागणी केली.पाच आंदोलकांपैकी कोणीही पळून जाणाय्रांपैकी नव्हते. त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व गुन्हे सात वर्षांच्या आत शिक्षा असलेल्या कलमा होत्या. अशा गुन्ह्यात दि.२ जुलै २०१४ मध्ये मा.सर्वोच्च न्यायालयातील अर्नेश कुमार विरूद्ध स्टेट ऑफ बिहार मधील पारित आदेशातील तरतुदीनुसार रात्री उशिरा पर्यंत पोलीस स्टेशन येथूनच नोटीस देऊन सोडू शकले असते.
परंतु लोकशाही मार्गाने सुरू असलेला आंदोलन (Gadchiroli Naxalite Chalval) स्थानिक पोलिसांनीच सुपारी घेऊन दडपण्याचा प्रयत्न केला गेला. बहुतांश आंदोलक हे भाजपाच्या विचारसरणीचे होते. जिल्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे असून पालकमंत्री आहेत.तरीही हा आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कोरची पोलीसांच्या या अजब भुमिकेमुळे मग नक्षलवाद आणि कोरचीची पोलीस यांच्यात फरकच काय असा प्रश्न उपस्थित करून अनेकांना अंतर्मुख करण्यास भाग पाडले आहे.




