गडचिरोली (gadchiroli news) : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अक्षरशः अवैद्य दारूचा महापूर असून गडचिरोली पोलीस स्टेशन हद्दीत जप्त करण्यात आली एक कोटी 36 लाख रुपयांच्या एक लाख 28 हजार 631 दारूच्या बॉटल्सवर पोलीस प्रशासनाला रोड रोलर फिरवावा लागला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षील्यांचा बंदोबस्त करण्यासोबतच जिल्ह्यातील दारूबंदीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. एकट्या पोलीस स्टेशन गडचिरोली अंतर्गत 2017 ते 2023 या 6 वर्षाच्या कालावधीतील दाखल एकुण 510 गुन्हयामधीलएक कोटी पसतीस लाख एकोनएैंशी हजार तीनशे छत्तीस रुपयांचा जप्त करण्यात आलेला मुद्देमाल रोडरोलर च्या साहाय्याने नष्ट करण्यात आला आहे.
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील हे वास्तव असून जिल्ह्यातील इतरही तालुक्यातील पोलीस स्टेशन मध्ये पकडलेला अवैध दारूचा साठा पडून आहे. एकाच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये करोडोची अवैद्य दारू नष्ट करण्याची वेळ प्रशासनावर येत असेल तर जिल्ह्यातील इतर तालुक्याचा विचार न केलेलाच बरा. विशेष म्हणजे या अवैद्य दारू मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नकली दारू राहत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.