गडचिरोली(Gadchiroli):- देशातील नामवंत व सुप्रसिद्ध असलेल्या रोटरी क्लब गडचिरोली (Rotary Club Gadchiroli) शाखेतर्फे रोटरी उत्सव मेला २०२५ चे आयोजन देवकुळे प्रांगण हॉटेल लँडमार्कच्या बाजूला मुल रोड येथे १५ ते १९ जानेवारी २०२५ पर्यंत करण्यात आले आहे.
हास्य कविसंमेलनासह विविध उपक्रमांचे आयोजन
या उत्सवात पुष्परचना स्पर्धा, सोलो डान्स स्पर्धा, कपल डान्स, डिश व सलाड डेकोरेशन तथा कुकिंग स्पर्धा, ग्रुप डान्स, कडधान्यापासून रांगोळी स्पर्धा, ओपन टॅलेंट शो स्पर्धा, महा चित्रकला स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या रोटरी उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे तंबोला हौवजी होय. या तंबोला हौजीत दररोज गडचिरोलीकरांना लाखो रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी रोटरी उत्सवाच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने गडचिरोलीकरांनी रोटरी उत्सव मेला २०२५ येथे सहभागी व्हावे, असे आवाहन रोटरी उत्सवचे अध्यक्ष सुनील बट्टूवार, सचिव विश्राम होकम यांनी केले आहे.
या उत्सवात गडचिरोलीकरांना नक्कीच आनंद लुटता येणार
रोटरी उत्सवासाठी रोटरी क्लब गडचिरोलीचे दिवाकर बारसागडे, नीरज जैन, नंदकिशोर काबरा, गोविंद सारडा, अॅड. कविता मोहरकर, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, हेमंत राठी,संजय गुप्ता, कर्नल विक्रम मेहता, अमित सूचक, अंकुश गुंडरलावार, राजेश इटणकर, सचिन तंगडपल्लीवार, डाॅ. अद्वय अप्पलवार, दिनेश पुंडे, ईशांत राळे, विलास बल्लमवार, सूरज बनकर, जितेंद्र धात्रक, नवीन मित्तल, अनिल तिडके, सतीश चिचघरे, राकेश चडगुलवार, सतीश त्रिनगरीवार, मनीष उत्तरवार, अजय बर्लावार, अनुराग पिपरे, ज्योती देवकुले, वैष्णवी डोंगरे, वैष्णवी दखणे, केतनभाई, नीलेश पटले, सुयोग मादुरवार आदी सदस्यांनी केले आहे. तसेच या उत्सवात विविध प्रकारचे आकर्षक असे खरेदी विक्रीचे स्टॉल, स्वादिष्ट खाद्य पदार्थांचे स्टाॅल्स लागणार आहेत. त्यामुळे या उत्सवात गडचिरोलीकरांना नक्कीच आनंद लुटता येणार आहे, असे मत रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील बट्टूवार यांनी व्यक्त केले आहे.