– तुटलेले पुल पावसाळ्यात अडवणार मार्ग
अहेरी (Aheri) :- गेल्या सात वर्षांपासून आलापल्ली ते सिरोंचा (Alapally to Sironcha) ३५३-सी. या राष्ट्रीय महामार्गावर
(National Highway) दक्षिण भागातील नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. रस्ता बांधकामासाठी (road construction) निधी मिळाला, टेंडर झाले, अनेक प्रयत्नानंतर का होईना वनविभागाचे (Forest Department) नाहरकत प्रमाणपत्रही मिळाले. मात्र, कंत्राटदारांच्या दिरंगाईमुळे महामार्गाचे काम अजूनही प्राथमिक स्तरावरच आहे. काही पुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. ते पावसाळ्यापूर्वी होणे कठीण आहे. तात्पुरत्या स्वरूपात बांधलेले रपट्यांवर चिखल निर्माण होऊन पावसाळ्यात वाहतूक ठप्प पडण्याची शक्यता आहे.
– अवकाळी पावसामुळे जागोजागी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले
आलापल्ली ते सिरोंचा १०० किलोमीटर अंतर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) विविध कंत्राटदारांकडून मागील काही महिन्यांपासून काम सुरू करण्यात आले आहे. काही ठिकाणी सपाटीकरण करण्यात आले, काही ठिकाणी अजूनही खोदकाम सुरू आहे. काही ठिकाणी मुरूम टाकण्यात आले तर बऱ्याच ठिकाणी पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जागोजागी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे दिसून येत आहे
– ४ महिने या मार्गावरील प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे
या रस्त्यावर छोटे-मोठे असे जवळपास २० ते २५ पूल (20 to 25 pools) असून बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यापूर्वी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. पुढील काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असून पुलाचे बांधकाम मात्र पूर्ण होणार अशी स्थिती नाही. त्यामुळे पावसाळ्यातील जवळपास ४ महिने या मार्गावरील प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. विशेष म्हणजे पुलाचे बांधकाम करताना बाजूला रहदारीसाठी मातीने रपटा तयार करण्यात आला आहे. परंतु, पाणी वाहून जाण्यासाठी त्यात सिमेंट पाइप (Cement pipe) टाकले नाहीत