रागड किल्ल्याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष
गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील (Armory Taluka) वैरागड गावाच्या मध्यांतरित वसलेला इतिहासाला साक्ष देत उभे असलेला किल्ला पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षपणामुळे (Neglect Department Archaeology) नामशेष होण्याच्च्या मार्गावर असुन तो आता शेवटच्या घटका मोजत असल्याचे दिसुन येत आहे. वैरागड गावाला (Vairagad village) विराट नगरी म्हणून सुद्धा संबोधल्या जाते. ई. स. नवव्या शतकात (ninth century) माना समाजाचे नागवंशीय ‘कुरुमपृहोद (Serpentine ‘Kurumprahod’) नावाच्या राजाने किल्ला बांधलात्यावेळेस औरस- चौरस पन्नास कि. मी. अंतरावर वसलेल्या गावात किल्ला बांधून राजा सुराज्य चालवीत होता. किल्ल्याच्या वायव्य दिशेस मुस्लिमांचे श्रद्धास्थान (pilgrimage for Muslims) असलेले इदगाहच्या बाजूस घनदाट जंगलात राजाने हिऱ्याची खाण (diamond mine) खोदून त्याचा व्यापार करायचा तसेच कापूस, नारळ, सुपारी, हिरे, सोने, चांदी आणि इतर वस्तूचा इथे मोठ्या प्रमाणात व्यापार चालायचा. व्यापार करण्यासाठी जम्मू काश्मीर, मध्यप्रदेश, छत्तीसगड (Jammu Kashmir, Madhya Pradesh, Chhattisgarh) तसेच अनेक राज्यातून व्यापारी येथे व्यवसाय करण्यास येत होते. भरभराटीत असलेल्या वैरागड नगरीत इ.स. १४७१ मध्ये महंमदशहा बहामनी ३ रा (Mahmudshah Bahamani 3rd) या सुलतानाचा सेनापती युसुफ आदिलखान (Yusuf Adil Khan) याने आक्रमण करून किल्ल्या भोवतालील खंदकामुळे सहा महिन्याच्या अथक प्रयत्नाने हा किल्ला जिंकून त्याची नासधूस केली. व्यवसाय करण्यास येत होते. भरभराटीत असलेल्या वैरागड नगरीत इ.स. १४७१ मध्ये लढाईत मारल्या गेलेल्या सैनिकांच्या स्मृती प्रित्यर्थ वायव्य दिशेस एका लहान टेकडीवर कबरी बांधल्या. त्या कबरी आजही जीर्ण अवस्थेत आहेत. फक्त इदगाह कायम आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव पुरातत्व विभागाचे फेटाळला
शासनाच्या दुर्लक्षामुळे (Due to government neglect) सन २००० मध्ये येथील गावातील नागरिकांनी काही दिवस गाव बंद पाळून किल्ल्यामध्ये असलेल्या झाडे-झुडपांची सफाई केली. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी वैरागड किल्ल्याची पाहणी करून किल्ल्यात मुलांसाठी बगीचा, खंदकात जलविहारासाठी नौकायान आणि किल्ल्यात कारागृह बनविण्याचा प्रस्ताव तयार केला होता. पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली किल्ला असल्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.