यावर्षी पाऊस जिल्ह्याची वार्षिक सरासरी गाठणार ? हवामान खात्याने ११० टक्के पाऊस पडण्याचे दिले संकेत
गडचिरोली (Gadchiroli) : यावर्षी भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) ११० टक्के पाऊस पडण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे यावर्षी पाऊस गडचिरोली जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी (Annual average rainfall) गाठण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे नियमित पाऊस आल्यास यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने जून ते सप्टेंबर (June to September) या कालावधीत पडलेला पाऊस खरीप हंगामातील पाऊस म्हणुन ग्राह्य धरला जातो. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान
१५०२.३ मीमी आहे. गेल्या काही वर्षापासून मात्र असमान पाऊस आहे. पडत असल्याचे दिसुन येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची मदार सर्वस्वी पावसावर अवलंबुन असते. खरीप हंगामात चांगला पाऊस आला तर शेतकऱ्यांना वेळोवळी पाणी उपलब्ध होऊन वेळेवर पन्हे भरणी, रोवणी व ईतर कामे करता येतात. मात्र वातावरणातील बदलामुळे दरवर्षी पाऊस कमी-जास्त प्रमाणात पडत
पावसाळयातील १२० दिवसापैकी ८३ दिवस पाऊस कोसळला.
यामुळे वार्षिक पावसाची टक्केवारी तब्बल ११५.४६ टक्के होती. २०२० मध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. पावसाची वार्षिक सरासरी १५०२.३ मीमी असतांना यावर्षी ११२४ मीमी पावसाची नोंद झाली होती. यावर्षी ९० दिवस पाऊस आला. मात्र पावसाची टक्केवारी ८५ टक्के राहीली.गेल्या पाच वर्षाचा विचारकरता २०१९ मध्ये १७३४.६ मीमी पावसाचीनोंद झाली होती. यावर्षी सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस
पडला. यावर्षी वार्षिक १२८३ मीमी पावसाची नोंद करण्यात आली. यावर्षी गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत जास्त दिवस म्हणजे ९१ दिवस पाऊस पडला. मात्र पावसाचे प्रमाण कमी राहील्याने पावसाची टक्केवारी ८५.४२ टक्के राहीली. २०२२ मध्ये मागील तिन वर्षाच्या उलट स्थिती राहीली. यावर्षी तब्बल १८१७ मीमी पावसाची नोंद झाली. यावर्षी तब्बल १०७ दिवस पाऊस कोसळला नोंद झाली. त्यामुळे यावर्षी अनेक भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली होती.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे योग्य नियोजन करावे
जून महिण्याच्च्या ७ तारखेपासून मृग नक्षत्रास (Mrig Nakshatra) प्रारंभ होत आहे. आता सद्यास्थितीत जिल्ह्यात तेंदुपत्ता हंगाम सुरू असल्याने शेतीची कामे बंद आहेत. तेंदुपत्ता हंगाम ८ ते १५ दिवसात (Tendupatta season in 8 to 15 days) आटोपल्यानंतर शेतकरी परत शेतीच्या कामाकडे लक्ष देणार आहेत. यावर्षी वार्षिक सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस येण्याची वर्तविलेली शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे योग्य नियोजन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.