- खंडीत विद्युत पुरवठा सुरू करा अन्यथा आंदोलन
( Gadchiroli ) : – एटापल्ली तालुका मुख्यालयापासून सहा की. मी. अंतरावरील ऐकरा (बूज.), ऐकरा (खुर्द) तसेच दोन्ही गावांची दोन टोले अशा चार गावांचा वीज पुरवठा गेली पंधरा दिवसांपासून खंडित असून खंडित वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणी नगरसेवक मनोहर बोरकर, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश आलामी, पोलीस पाटील सादु दुर्वा व नागरिकांनी तहसीलदार ( Tehsildar ) हेमंत गांगुर्डे ( Hemant Gangurde ) यांना निवेदनातून केली आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असाही ईशारा गावकऱ्यांनी दिला आहे.उन्हाळ्याच्या उकडत्या तापमानात गर्मीच्या त्रासाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, वयोवृद्धनागरिक, लहान बालके व आजारी नागरिकांना उन्हाच्या तडाख्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनातून म्हटले आहे.
– समस्येवर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार माहिती देऊन कोणतीही कार्यवाही केली जात नाही
घरगुती वापराचे फ्रीज, कुलर, पंखे, मोबाईल संच, पीठ गिरणी अशी विद्युत उपकरणे खराब होऊन नागरिकांवर आर्थिक भुर्दंड बसत आहे. या समस्येवर वीज वितरण कंपनीच्या ( Electricity Distribution Company ) अधिकाऱ्यांना वारंवार माहिती देऊन कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून खंडित असलेला वीज पुरवठा पूर्ववत सुरू करून देण्याची मागणी तहसीलदार हेमंत गांगुर्डे दिलेल्या निवेदनातून यांना नगरसेवक मनोहर बोरकर, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश आलामी, पोलीस पाटील सादु दुर्वा, माजी सरपंच सादु गावडे, नंदू मट्टामी, देऊ गावडे, दलसु मितलामी व नागरिकांनी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा निवेदनातून देण्यात आला आहे.