प्रशासनाने जलद गतीने प्रक्रिया राबविण्याची गरज
गडचिरोली (Gadchiroli) : 2017 मध्ये तत्कालीन युती सरकारने शेतकऱ्यांना (Farmer) कर्जमाफी देणारी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (Chhatrapati Shivaji Maharaj Farmers’ Honor Scheme) जाहीर केली होती. या योजनेत दीड लाख रुपयांपर्यंतचे सर्व कर्ज माफ (Loan Waiver) करणे, 50 हजार रुपये प्रोत्साहन, दीड लाखांवरील कर्जात सवलत अशा तीन प्रकारांचा समावेश होता. ही योजना जाहीर करणारे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), त्यानंतर एकनाथ शिंदेही (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले. आता परत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. परंतु जिल्ह्यातील 787 शेतकरी अद्यापही योजनेच्या लाभापासून वंचित असल्याची माहिती झाली प्राप्त आहे.
तत्कालीन युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती. कालांतराने या योजनेच्या नावात बदल करून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Farmer Loan Waiver Scheme) असे नामकरण करण्यात आले.
या योजनेअंतर्गत; अल्प मुदतीचे पीक कर्ज आणि पुनर्गठन पीक कर्ज 7 सप्टेंबर रोजी घेतले जाईल आणि अनुक्रमे 1 एप्रिल ते 9 मार्च पर्यंत प्रलंबित असेल. सरकार (Government) कर्जमुक्तीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात भरणार आहे. शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज माफ केले जाईल. 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज आणि पुनर्रचित पीक कर्ज माफ केले जाईल असे ठरविण्यात आले होते.
या अंतर्गत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहिती नुसार नोव्हेंबर 2024 पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत 4872, राष्ट्रीयकृत बँकेअंतर्गत 9374 तसेच ग्रामीण बँकेअंतर्गत 2067 अशी एकंदरीत 16313 शेतकऱ्यांची खाती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. यापैकी 15547 खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले. संपुर्ण प्रक्रिये अंतर्गत 15526 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (Bank Account) 75.44 कोटी रूपयांचा निधी जमा करण्यात आला.
यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 4749 शेतकऱ्यांच्या खात्यात 16.70 कोटी, राष्ट्रीयकृत बँकेच्या 8795 शेतकऱ्यांच्या खात्यात 46.18 कोटी व ग्रामीण बँक (Gramin Bank) अंतर्गत पात्र 1982 शेतकऱ्यांच्या खात्यात 12.56 कोटी रूपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी अभावी 787 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही प्रक्रिया जलदगतीने राबविण्याची मागणी होत आहे.
प्रोत्साहनपर योजनेचेही 6065 शेतकरी लाभापासून वंचित
कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना शासनाने प्रोत्साहनपर योजना लागु केली होती. या अंतर्गत नोव्हेंबर 2024 पर्यंत गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील 20906 शेतकऱ्यापैकी; 14 हजार 841 शेतकऱ्यांना 47. 3 कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. अद्यापही 6065 शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत 3871 शेतकरी, राष्ट्रीयकृत बँके (Nationalized Bank) अंतर्गत 1284 आणि ग्रामीण बँकेअंतर्गत 910 शेतकरी अद्यापही लाभापासून वंचित असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.