गडचिरोली (कोरेगाव/Gadchiroli):- देसाईगंज तालूक्यातील कोरेगाव, चोप येथे 200 वर्षा पासुन पारंपीक पद्धतीने गोवर्धन पुजा केली जाते. विदर्भातील आदिवासी गोंडगोवारी जमातीतर्फे (Tribal Gondgowari tribe) आजही तितक्याच श्रद्धेने व पारंपारिक पद्धतीने ऐतिहासिक व परंपरेचा वारसा लाभलेली गाय गोधन पूजा आजही वडसा तालुक्यातील कोरेगावातील आदिवासी गोंड गोवारी जमातीकडून अव्याहतपणे सुरू आहे.
गाय गोधन पूजा आजही वडसा तालुक्यातील कोरेगावातील आदिवासी गोंड गोवारी जमातीकडून अव्याहतपणे सुरू
गाई राखणे हा गोंड गोवारी जमातीच्या लोकांचा पारंपरिक व्यवसाय त्यामुळे हे गाईची तितक्याच भक्ती भावाने पूजा करून तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. दीपावलीच्या चौथ्या दिवशी बलिप्रतिपदेला गाय गोधन व ढाल पूजेचा उत्सव साजरा केला जातो. घरी गायीची पूजा केल्यानंतर सार्वजनिक पूजेसाठी गाईंना गाय गोधनाचे पटांगणावर आणले जाते. या पटांगणावर भरपूर शेना पासून एक मोठी भुरशी बनवण्यात येते या भुरशीमध्ये एक अंडे व कोंबडीचे लहान जिवंत पिल्लू ठेवण्यात येते. यावेळी आदिवासी गोंड गोवारी जमातीतील लोक ढालीचे पूजन करतात यामध्ये चार मुखी ढाल ही माता रायताड जंगो चे प्रतीक अर्थात स्त्री रूपाची असते तर दोन मुखी ढाल ही धर्मगुरू पहांदी पारी कृपारलिंगोची प्रतीक अर्थात पुरुष रूपाची असते. परंपरेनुसार मा.श्याम उईके पोलीस पाटील कोरेगाव यांना या जमातीने आमंत्रित करून त्यांच्या हस्ते गायगोधनाची पूजा करण्यात येते. यानंतर अंडे व जिवंत पिल्लू असणाऱ्या गायगोधनावरून गाईंना कळपांनी सोडण्यात येते, पण अंडे व पिल्लू यांना इजा झालेली नसते.
याप्रसंगी समाजातील ज्येष्ठ नागरिक सर्व सदस्य आणि गावातील सर्व गावकरी मंडळी खूप मोठ्या संख्येने उपस्थित झाले .