बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाकडून नागपूरमध्ये डिलर पार्टनर म्हणून गॅलॅप्स ऑटोहॉसची नियुक्ती
नागपूर (Nagpur) : बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाने (BMW Group India) नागपूरमधील आपले डिलर पार्टनर म्हणून (Gallops Autohaus) गॅलॅप्स ऑटोहॉसच्या नियुक्तीची घोषणा केली. 2014 पासून नागपूरमधील यशस्वी कार्यसंचालनांनतर म्युनिक मोटर्सने रायपूरमधील आपल्या कार्यसंचालनांना धोरणात्मकरित्या प्रबळ करण्याच्या प्रयत्नामध्ये नागपूरमधील आपले व्यवसाय व कार्यसंचालन (Gallops Autohaus) गॅलॅप्स ऑटोहॉसकडे हस्तांतरित केले आहे. एकसंधी व्यवसाय सातत्यतामधून विद्यमान बीएमडब्ल्यू ग्राहकांना त्यांच्या गरजांची पूर्तता होण्याची खात्री मिळेल, जेथे विद्यमान सेल्स व सर्विस लोकेशन्स तेच राहतील आणि विद्यमान (BMW Group India) बीएमडब्ल्यू कर्मचारी बॅनर अंतर्गत काम करत राहतील.
बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे (BMW Group India) प्रेसिडण्ट विक्रम पावाह म्हणाले की, मी नागपूरधील बीएमडब्ल्यू ग्राहकांना सेवा देण्याप्रती बहुमूल्य योगदान व स्थिर समर्पिततेसाठी म्युनिक मोटर्सचे आभार व्यक्त करतो. आम्ही त्यांच्या यशस्वी कामगिरीचे कौतुक करतो आणि त्यांना भविष्यात यशस्वी होत राहण्यास शुभेच्छा देतो. नागपूर (BMW Group India) बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि ग्राहकांना अद्वितीय सेवा प्रदान करण्याप्रती आमची कटिबद्धता कायम आहे. आम्हाला नागपूरमधील आमचे डिलर पार्टनर म्हणून गॅलॅप्स ऑटोहॉसच्या नियुक्तीची घोषणा करण्याचा आनंद होत आहे. (Gallops Autohaus) लक्झरी उद्योगामधील विद्यमान ट्रेण्ड्सबाबत त्यांना असलेली माहिती, आमच्या निष्ठावान ग्राहकांच्या गरजांकडे बारकाईने दिलेले लक्ष आणि सर्वोत्तम अनुभवांची निर्मिती करण्यामधील कौशल्य सर्वसमावेशक व ग्राहक-केंद्रित सहभागाला चालना देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. नागपूरमधील सूक्ष्मदर्शी ग्राहकांना अपवादात्मक सेवा प्रदान करण्यास उत्सुक आहोत.’
म्युनिक मोटर्सचे डिलर प्रिन्सिपल प्रशांत मंधन म्हणाले की, (BMW Group India) बीएमडब्ल्यूचे म्युनिक मोटर्समध्ये विशिष्ट स्थान आहे आणि आमचा एकत्रित प्रवास लाभदायी व संस्मरणीय राहिला आहे. म्युनिक मोटर्स नागपूरमधील आपल्या व्यवसाय कार्यसंचालनांमध्ये वाढ करण्यास सज्ज आहे, जेथे आम्ही पुन्हा एकदा नवीन व अधिक लक्ष्य धोरण विकास घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे. नागपूरमधील क्षमतेला गॅलॅप्स ऑटोहॉसकडे हस्तांतरित करत आम्ही आमच्या निष्ठावान ग्राहकांचे त्यांच्या अविरत पाठिंब्यासाठी आभार व्यक्त करतो आणि त्यांना एकसंधी संक्रमणाची खात्री देतो.
नागपूर डिलरशिपचे नेतृत्व गॅलॅप्स ऑटोहॉसचे (Gallops Autohaus) डिलर प्रिन्सिपल मि. तनुज पुगालिया यांच्याद्वारे केले जाते. गॅलॅप्स ऑटोहॉस गुजरातमधील (अहमदाबाद व राजकोट) मधील सेल्स व सर्विस सुविधांसह बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे प्रतिनिधित्व करते. (Gallops Autohaus) गॅलॅप्स ऑटोहॉसचे डिलर प्रिन्सिपल तनुज पुगलिया म्हणाले की, गॅलॅप्स ऑटोहॉस आणि (BMW Group India) बीएमडब्ल्यू ग्रुप इंडिया यांच्यामधील संपन्न सहयोग आमच्यासाठी वर्षानुवर्षे सातत्यपूर्ण विकासासह प्रेरणास्रोत राहिला आहे. गुजरातमधील आमच्या व्यवसाय कार्यसंचालनांमध्ये वाढ होत असताना नागपूरमधील डिलर पार्टनर म्हणून आमच्या उपस्थितीमध्ये वाढ देशभरात आमचा वारसा निर्माण करण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल आहे. आम्ही ही संधी देण्यासाठी (BMW Group India) बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे आभार व्यक्त करतो, तसेच आम्हाला आमच्या विकासगाथेमध्ये आणखी एका चॅप्टरची भर करण्याची अपेक्षा आहे.
नागपूरमधील (BMW Group India) बीएमडब्ल्यू ग्राहकांना अद्वितीय सेवा व लक्झरीअस अनुभव प्रदान करण्याप्रती कटिबद्ध आहोत, जेथे नागपूरमधील ग्राहकांनी नेहमीच अद्वितीय सेवांचा आनंद घेतला आहे. आम्ही गॅलॅप्स ऑटोहॉस कुटुंबामध्ये नवीन सदस्यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत आणि सर्वोत्तमतेचा उच्च दर्जा कायम राखण्याप्रती समर्पित आहोत, जो बीएमडब्ल्यू सोबतच्या आमच्या सहयोगाला नव्या उंचीवर नेतो. कार्यसंचालनांच्या हस्तांतरणानंतर (Gallops Autohaus) गॅलॅप्स ऑटोहॉस नेहमीप्रमाणे बीएमडब्ल्यू आणि (BMW Group India) बीएमडब्ल्यू प्रीमियम सिलेक्शन वेईकल्सची विक्री व सर्विस करेल.