पुलगाव पोलिसांची कारवाई, नऊ जणांवर गुन्हा दाखल
पुलगाव (Gambling Crime) : हिवरा (हाडके) येथील अमन ब्रिक्स फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेत चार लाख ४९ हजार रुपयांचा रोख रकमेसह ७४ लाख ८ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई २९ ऑगस्ट रोजी करण्यात आली.
पोलिसांनी गोपनिय सूत्रांच्या माहितीवरून, पुलगाव पोलिस ठाण्यांतर्गत हिवरा (हाडके) येथील अमन ब्रिक्स फार्म हाऊसमध्ये (Gambling Crime) छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना जुगार सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ४ चारचाकी वाहने, एक दुचाकी, १३ मोबाईल तसेच ४ लाख ४९ हजार १३० रुपयांसह ७४ लाख ८ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यावेळी किशोर कल्पे (वय ५६) रा. नाचणगाव रोड पुलगाव, प्रमोद हरणे (वय४४), रा. बोरगाव (मेघे), प्रमोद घालणी (वय ५७) रा. जवाहर कॉलनी, नितीन वाघाडे (वय ५३), रा. शिवाजी कॉलनी, कैलाश धारवाटकर (वय ५२) रा. वर्धा, भूषण वाघमारे (वय३५) रा. पुलगाव, आशीष सावरकर, (वय ४०) रा. पुलगाव, रीतेश चौरे (वय ४०) रा. वर्धा, दत्तात्रय बिरे (वय ५८), रा. चिंतामणी कॉलनी पुलगाव या नऊ जणांना ताब्यात घेत कारवाई केली. पोलिसांनी एमएच ३१ एफएक्स ६५८५, एमएच २७ बीई ७८९१, एमएच ३२ एएक्स ९९७७, एमएच ३२ एएक्स २२९२ क्रमांकाची चारचाकी वाहने तसेच एमएच ३२ एडब्ल्यू ७४१६ क्रमांकाची दुचाकी तसेच पत्ते जप्त करण्यात आले.
उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक यशवंत सोलसे, पोलिस उपनिरीक्षक घनश्याम जाधव, सुधीर बनकर, प्राजक्ता पवार, रितेश गुजर, गणेशसिंग इंगळे, सत्यजीत काकन्न, संदीप चौर, रामदास दराडे, संदीप बोरबन, प्रवीण घनमोडे, भूषण हाडके यांनी केली. याप्रकरणी पुलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
