दोन कर्मचारी निलंबित
जिवती/चंद्रपूर (Mahavitaran office) : येथील महावितरण उपकार्यकारी अभियंता कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून जुगार खेळणे हे ऑनड्यूटी असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सदर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत बल्लारशाचे कार्यकारी अभियंता या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले आणि काही तासाच्या आतच कार्यालयात जुगार खेळणाऱ्या त्या दोन कर्मचाऱ्यांना तत्काळ प्रशासनाने निलंबित केल्यामुळे (Mahavitaran office) महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
प्रधान तंत्रज्ञ रवींद्र गंधारे व भारत वाघ अशी निलंबित
कर्मचाऱ्यांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, हे कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या (Mahavitaran office) महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून आपल्या सहकाऱ्यासोबत जुगार खेळत होते. या दरम्यान कोणीतरी त्यांचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचला. कार्यालयात बसून जुगार खेळत असल्यामुळे अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. व चौकशीनंतर दोघांना निलंबित करण्यात आले आहे.
या कारवाईने (Mahavitaran office) महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. कार्यालयात बसून जुगार खेळल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्याबद्दल नागरिक रोष व्यक्त करतांना दिसत आहेत. या प्रकरणात आणखीही काही कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.