हिंगोली (Gambling raids) : कळमनुरी व वसमतमध्ये अवैधरित्या जुगार सुरू असताना पोलिसांनी छापे मारून मोठा मुद्देमाल जप्त केला. कळमनुरी येथील नवीन बसस्थानकाजवळ असलेल्या देशी दारूच्या दुकाना नजीक तितली भवरा जुगार सुरू असताना जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने ४ नोव्हेंबरला छापा मारला. ज्यामध्ये नगदी २१ हजार ९२० रूपये, २५ हजाराचे दोन मोबाईल असा एकूण ४६ हजार ९२० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या (Gambling raids) प्रकरणी कळमनुरी पोलिसात विठ्ठल मुकाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जावेद पठाण तिरखाँ पठाण रा.नुरी मोहल्ला कळमनुरी, शिवाजी सोनाजी गवले रा.गवलेवाडी ता.औंढा नागनाथ या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणाचा पुढील तपास पोले करीत आहेत.
त्याचप्रमाणे वसमत शहरातील रेल्वे स्टेशन रस्त्यावर झन्नामन्ना जुगार सुरू असताना ४ नोव्हेंबरला पोलीस उपनिरीक्षक साहेबराव कसबेवाड यांच्यासह पथकाने मारलेल्या छाप्यात घटनास्थळी तीन मोटार सायकल, नगदी रक्कम, मोबाईल असा एकूण २ लाख ४६ हजार ६९० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात वसमत शहर पोलिसात पोउपनि साहेबराव कसबेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख जमाल उर्फ हबुलाला शेख नुर, अवेश खान अन्वर खान पठाण, शहनवाज शेख खाजा, अशोक भाऊराव देवकते, स्वप्नील उर्फ सोप्या मोहनराव वाव्हळे रा.वसमत या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या (Gambling raids) प्रकरणाचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के हे करीत आहेत.