मिरवणुकीत गैरप्रकार आढळल्यास होणार कारवाई
हिंगोली (Ganapati Visarjan) : जिल्ह्यात ७ सप्टेंबरला सर्वत्र श्री ची स्थापना झाली असताना १७ सप्टेंबरला श्री चे विसर्जन होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १४०६ श्री चे विसर्जन करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यात १४६४ ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाच्यावतीने श्री ची स्थापना ७ सप्टेंबरला करण्यात आली आहे. त्या निमित्ताने सतत दहा दिवस धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसाद वाटप करण्यात येत आहे. १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून त्या दिवशी १४०६ ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्री चे विसर्जन (Ganapati Visarjan) करण्यात येणार आहे.
ज्यामध्ये पोलिस ठाणे निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे हिंगोली शहर ५७, औंढा नागनाथ २१५, कळमनुरी ११५, वसमत शहर १०६, सेनगाव १६७, आखाडा बाळापूर १४०, हट्टा ११३, कुरूंदा ८२, हिंगोली ग्रामीण ८१, गोरेगाव ९०, नर्सी नामदेव ५९, बासंबा ७८, वसमत ग्रामीण १०३ अशा १४०६ ठिकाणी श्री चे विसर्जन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे १८ सप्टेंबरला हिंगोली शहर ४२, कळमनुरी, सेनगाव, बासंबा प्रत्येकी २ तर नर्सी नामदेव , हिंगोली ग्रामीण ठाणे हद्दीत प्रत्येकी १ आणि १८ सप्टेंबरला नर्सी नामदेव ठाणे हद्दीत एका श्री चे विसर्जन होणार आहे. विशेष म्हणजे १४ सप्टेंबरला १, १५ सप्टेंबरला २ ठिकाणी श्री चे विसर्जन करण्यात आले तर आज १६ सप्टेंबरला चार ठिकाणच्या श्री चे विसर्जन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये हिंगोली शहर, कळमनुरी, हट्टा व गोरेगाव पोलिस ठाणे हद्दीतील प्रत्येकी एका गणेश मंडळाच्या श्री चा (Ganapati Visarjan) समावेश आहे. श्री च्या मिरवणुकीत भाविकांनी गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्यांची उधळण करावी. कोणीही मिरवणूक दरम्या गैरप्रकार केल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे.
श्री विसर्जन मिरवणुकीवर ड्रोण कॅमेर्याची राहणार करडी नजर
१७ सप्टेंबरला सर्वत्र सर्वाधिक सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्री चे विसर्जन (Ganapati Visarjan) केले जाणार आहे. त्या निमित्ताने भव्य मिरवणुकाही काढल्या जाणार आहेत. मिरवणुकीत कोणताही गैरप्रकार अथवा हुल्लडबाजी होऊ या दृष्टीकोणातून जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात केला आहे. यासोबतच मिरवणूक दरम्यान ड्रोण कॅमेर्याची नजर राहणार असून चार व्हिडीओ कॅमेरे व साध्या वेशात पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. बंदोबस्तासाठी ७४ पोलिस अधिकारी, ५९२ पोलिस कर्मचारी, ४७० पुरूष होमगार्ड, १०० महिला होमगार्ड, सुसज्ज स्थितीतील ५ टनी वाहन चालकांसह १ एटीबी पथक, १ बीडीडीएस पथक, २ आरसीबी पथक व १ एसआरपीएफ प्लाटून तैनात करण्यात आली आहे.