बुलडाणा (Prataprao Jadhav) : दिल्ली येथील 23 अशोका रोडस्थित कार्यालयात कर्मचाऱ्यांनी बसवलेल्या (Ganaraya Aarti) गणरायाची केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) मनोभावे पूजा चर्चा करून आरती केली.
दिल्ली येथील 23 अशोका रोड येथे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे निवासस्थान व संपर्क कार्यालय आहे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गणरायाची स्थापना गणेश चतुर्थीला केली काल केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी कार्यालयातील गणरायाची आरती केली.
गणेश भक्ताच्या जीवनातील दुःख नाहीये होऊन देशातील जनता सुखी समृद्ध आणि निरोगी आयुष्य मिळू दे. बळीराजाला चांगले दिवस येऊ दे असे साकडे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी गणरायाच्या चरणी घातले. (Ganaraya Aarti) गणरायाची विधिवत पूजाअर्चा केली यावेळी त्यांच्यासोबत आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच मराठी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे दिल्ली येथील प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.




