कारंजा (Washim):- चांगल्या कार्यासाठी सत्कार होताना आपण पाहिले व ऐकले आहे. परंतु कारंजा तालुक्यातील कामरगाव वीज उपकेंद्रातील वारंवार वीज पुरवठा (Power supply)खंडित ठेवणार्या व तासंतास तांत्रिक बिघाड (Technical failure)दुरुस्त न करणार्या कनिष्ठ अभियंत्याचा नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर डोईफोडे यांच्या नेतृत्वात १३ जून रोजी गुलाब पुष्प देऊन सत्कार करत गांधीगिरी व्यक्त केली. यावेळी उपस्थितानी आपल्या मागण्यांचे निवेदन कनिष्ठ अभियंत्या(Junior Engineer) मार्फत कार्यकारी अभियंत्याला सादर केले. मागण्या मान्य न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यास विलंब लागणे हे प्रकार नित्याचे झाले
कामरगाव वीज उपकेंद्रातून वारंवार विविध पुरवठा खंडित होणे, कमी दाबाचा विजपुरवठा होणे, तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यास विलंब लागणे हे प्रकार नित्याचे झाले आहे. कामरगाव वीज उपकेंद्रातून कमी दाबाचा विजपुरवठा केला जात असल्याने घराघरातील इलेक्ट्रिक उपकरणे (Electric equipment) शोभेची वस्तू बनली असून, कमी दाबाच्या वीज पुरवठ्यावर उपकरणे सुरू राहिल्याने उपकरणे जळण्याच्या घटनांतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कामरगाव वीज उपकेंद्रा अंतर्गत येत असलेल्या गावात वीज पुरवठा खंडित होणे, कमी दाबाचा वीज पुरवठा होणे आणि तांत्रिक बिघाड दुरुस्त न करणे असे प्रकार मागील काही दिवसांपासून सातत्याने सुरू आहेत. या सदर्भात ग्राहकांकडून मागील तीन महिन्यांपासून तक्रारी करणे सुरू आहे.
कमी दाबाचा वीज पुरवठा केला जात असल्याने एसी, पंखे व कुलर चालत नाही
परंतु अद्याप पर्यंत परिस्थिती बदलली नाही. एकीकडे तापमानाचा (Temperature) पारा वाढल्याने दिवसा आणि रात्री जीवाची काहीली होत असताना दुसरीकडे कमी दाबाचा वीज पुरवठा केला जात असल्याने एसी, पंखे व कुलर चालत नाही तसेच विद्यूत पुरवठा तासंतास खंडीत राहत असल्याने परिसरातील नागरिक हैराण आहेत. त्या निषेधार्थ जनतेने गांधीगिरीचे अस्त्र उपसले आहे. गुरुवारी कामरगाव व धनज जिल्हा परिषद सर्कल मधील नागरिकांनी कामरगाव वीज उपकेंद्रावर धडक दिली आणि तेथील कनिष्ठ अभियंत्याचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर डोईफोडे यांच्यासह कामरगाव ग्रामपंचायतचे सरपंच साहेबराव तुमसरे व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.