प्रा. अरुण सांगोळे, सोमेश नार्वेकर यांच्या शब्द स्वरातून अवतरली भक्तीमय रचना!
अमरावती (Ganesh Utsav Hey Omkara) : ज्या गणरायाची आपण वर्षानुवर्षे वाट पाहत असतो त्या गणपतीची येत्या काही दिवसांत घरोघरी, सार्वजनिक मंगल ठिकाणी अतिशय आदरभावे स्थापना केली जाणार आहे. त्या निमित्ताने तयारीही सुरू झाली आहे. (Ganesh Utsav) गणेशाची महती सांगणारी बरीचशी गाणी यापूर्वी विविध माध्यमांतून रसिकांना भावली आहेत. नव्याने येणाऱ्या गाण्यांचेही उस्फुर्तपणे रसिकांकडून स्वागत केले जात असते.
सर्वत्र गणेशोत्सवाची (Ganesh Utsav) धामधूम सुरू असताना एका नव्या कोऱ्या गणरायाच्या गाण्याने साऱ्या गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे गाणे भाविकांच्या मनाचा ठाव घेत आहे.
या मंगलमय कारणाचे औचित्य साधून येथील प्रसिद्ध कवी आणि गीतकार अरुण सांगोळे यांच्या लेखणीतून अवतरलेले ‘हे ओंकारा’ (Hey Omkara) हे गीत यु ट्युबवर तसेच इतर समाज माध्यमातून प्रसारित करण्यात आले असून या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रसिद्ध संगीतकार आणि गायक सोमेश नार्वेकर (Somesh Narvekar) यांनी कवी अरुण सांगोळे (Prof. Arun Sangole) यांच्या या गीताला यथोचित चाल देऊन रसिकांच्या सेवेत अर्पण केले आहे. रसिकांना श्रवणीय गाणी देण्यात अग्रेसर असलेले सोमेश नार्वेकर (Somesh Narvekar) यांनी संगीतबद्ध केलेल्या या कर्णमधुर गाण्याला रसिकांची पसंती मिळेल, असा आशावाद कवी अरुण सांगोळे यांनी व्यक्त केला.
सदर गीत सोमेश नार्वेकर (Somesh Narvekar) युट्यूब चॅनलवर नुकतेच प्रसारित करण्यात आले आहे. या (Ganesh Utsav) गाण्याचे म्युझिक प्राॅडक्शन, मिक्सिंग,मास्टरिंग सोमेश नार्वेकर यांचे असून इडिट आणि व्हिएफएक्स चेतन गरुड प्राॅडक्शन स्टुडिओत तयार करण्यात आले. हे गीत गानरसिकांना स्पाॅटिफाय,विंक, अमेझॉन म्युझिक,जिओ सावन, इंस्टाग्राम रिल्स,ॲपल म्युझिक आणि गाना या म्युझिकल प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. ‘हे ओंकारा’ (Hey Omkara) या गाण्याचे अर्थपूर्ण शब्द आणि नादमय चालीमुळे या गणेशोत्सवात हे गीत रसिकांच्या गळ्यातील ताईत बनणार, एवढे निश्चित.