श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मार्गाची पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केली पाहणी
हिंगोली (Ganesh Utsav) : शहरातील गड्डेपीर गल्ली भागातील श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती बाप्पाच्या दर्शनाकरीता (Ganesh Utsav) गणेश उत्सवात लाखो भाविक येत असतात त्याअनुषंगाने जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सोमवारी मार्गासह मंदिर परिसराची पाहणी करून बंदोबस्ताच्या दृष्टीने आढावा घेतला.
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरात गणेश उत्सव (Ganesh Utsav) कालावधीत लाखो भाविकांची प्रतिवर्षीच गर्दी होत असते. १० दिवस भाविकांची मोठी रेलचेल असते. त्यामुळे गणेश उत्सवात गणपती बाप्पाच्या दर्शनाकरीता जणु काही पंढरीच अवतरल्याचे चित्र दिसुन येत असते. सप्टेंबर महिन्यात गणेश उत्सव असल्याने तेथील मार्गासह बंदोबस्ताचा आढावा नुतन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घेतला.
यावेळी त्यांनी ज्या-ज्या मार्गावर भाविकांची रांग असते तेथूून (Ganesh Utsav) मंंदिर स्थळापर्यंंत पाहणी केली. तसेच भाविकांना सुलभ दर्शन कशा पध्दतीने दिले जाते. याबाबतची माहिती देखिल दिलीप बांगर यांनी पोलीस अधिक्षक कोकाटे यांना दिली. यावेळी त्यांच्यासोबत अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, नरेंद्र पाडळकर, संस्थानचे दिलीप बांगर, सतिश लोहिया, बद्री मुुंदडा, मनोज दावनगिरे यासह इतरांची उपस्थिती होती.