हिंगोली (Ganeshotsav Festival) : सन २०२४ मध्ये हिंगोली जिल्ह्यात श्री गणेश स्थापना, विसर्जन तसेच (Ganeshotsav Festival) श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी स्वयंसेवक, सामाजिक संघटना व पोलीस दल यांनी मोलाची भुमिका बजावली त्यामुळे त्यांचा गौरव जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या संकल्पनेतुन जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या प्रमुख उपस्थीतीत हा गौरव सोहळा पार पडला. (Ganeshotsav Festival) श्री गणेशोत्सव सन २०२४ अंतर्गत हिंगोली जिल्हयामध्ये एकुण (१४६४) सार्वजनिक श्री गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली होती. त्याचप्रमाणे श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती चे जवळपास २ लाखा पेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतले. हिंगोली जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांचे विसर्जन आणि श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती दर्शन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दलाचे वतीने सुक्ष्म नियोजन करण्यात आले होते.
यासाठी निवृत्त पोलीस अधिकारी, स्वयंसेवी संघटना, स्वयंसेवक यांचा सहभाग करून घेण्यात आला. (Ganeshotsav Festival) श्री गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यामध्ये महत्वाची भुमिका बजावणार्या व गणेशोत्सव दरम्यान ‘स्वच्छता अभियान’ ‘रक्तदान शिबीर’ या सारखे सामाजिक उपक्रम राबविणार्या स्वयंसेवी संघटना, स्वयंसेवक तसेच पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार व निवृत्त पोलीस अधिकारी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवुन त्यांना गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, मारोती थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक सुधीर वाघ हिंगोली जिल्ह्यातील पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी, अंमलदार, श्री गणेश मंडळ स्वयंसेवक, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थीत होते.