Wardha Mephedrone Case :- एम.डी. (Mephedrone) अमली पदार्थ विक्री करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली. याप्रकरणी चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिसांनी सात लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, सात लाख ७ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून, सिंदी (मेघे) वर्धा येथील मटन मार्केट चौकात सापळा रचून नाकाबंदी केली. त्यावेळी यश निलेश पराते (वय २५) रा. न्यू रेल्वे कॉलनी सिंदी (मेघे), अंकुश गजानन तिरपूडे (वय २५) रा. हिंद नगर वर्धा, दर्पण अशोक बंडे (वय २९) रा. वार्ड नं. ३, वडगाव रोड, सेलू, विशाल रमेश बादलमवार (वय ३२) रा. सिंदी (मेघे) वर्धा यांची तपासणी (Checking) करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून एका प्लॉस्टीक जिप पॅकेटमध्ये एम.डी (मॅफेड्रॉन) अंमली पदार्थ पावडर वजन ३ ग्रॅम ७८० मिलीग्रॅम जप्त करण्यात आला.
पोलिसांनी एमडी अमली पदार्थासह (Drugs) ४ मोबाईल, एमएच ३२ एएच ८६०१ क्रमांकाची कार असा ७ लाख २० हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एम.डी (मॅफेड्रॉन) अंमली पदार्थ नागपूर येथील व्यक्तीकडून आणल्याची माहिती पुढे आली. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.




