परभणी/गंगाखेड (Gangakhed Accident) : गरोदर असलेल्या पत्नीला गंगाखेड येथे रुग्णालयात (Gangakhed Hospital) दाखवून दुचाकीवरून जवळा रू. येथे परत जाणाऱ्या मानवत येथील तरुणाचा दुचाकी अपघातात (Gangakhed Accident) मृत्यू झाल्याची घटना सुमारास गंगाखेड-परभणी रस्त्यावर खळी पाटीजवळ घडली आहे.
गंगाखेड-परभणी रस्त्यावरील खळी पाटी जवळील घटना
याबाबत माहितीनुसार, गंगाखेड तालुक्यातील जवळा रू. येथे बाळंतपणासाठी आलेल्या पत्नीच्या पोटात दुखत असल्याचे समजल्याने पत्नीला रुग्णालयात दाखविण्यासाठी मानवत येथून आलेल्या गणेश आश्रोबा चव्हाण (वय अंदाजे २८ वर्ष) नामक तरुणाने पत्नीला गंगाखेड येथील रूग्णालयात दाखवून तिला ऑटोत बसवून जवळा रू. ता. गंगाखेड येथे पाठवून देत स्वतः मात्र एमएच २२ एटी ८८७७ क्रमांकाच्या दुचाकीवरून जवळा रू . येथे जाण्यासाठी निघाला असता गंगाखेड – परभणी रस्त्यावर खळी पाटीजवळ दुचाकीला अपघात होऊन गंभीर जखमी (Gangakhed Accident) होवून अवस्थेत जागीच कोसळला. खळी पाटी जवळ अपघात झाल्याची माहिती समजताच सहायक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक युसुफ खान पठाण, पोलीस शिपाई परसराम परचेवाड आदींनी घटनास्थळी धाव घेत.
रावण भालेराव, परमेश्वर भालेराव यांच्या खाजगी रुग्णवाहिकेतून गंभीर जखमी अवस्थेतील गणेश चव्हाण यास (Gangakhed Hospital) गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आसता निवासी वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ. तांबोळी, परिचारिका उषा इधाटे यांनी तपासणी करून मृत घोषीत केले. (Gangakhed Accident) अपघातात मयत झालेल्या तरुणाची ओळख पटविण्यासाठी राज्य परिवहन अधिकारी (आर.टी.ओ.) दयानंद कांबळे यांनी दुचाकी क्रमांकावरून दुचाकी मालकाचा मोबाईल नंबर शोधून देत सहकार्य केल्याने अपघातात मयत झालेला तरुण हा मानवत येथील गणेश आश्रोबा चव्हाण असून त्याची पत्नी गंगाखेड तालुक्यातील जवळा रू. येथे आजोळी बाळंतपणासाठी आल्याचे समजल्याने त्याची ओळख पटली आहे. मयत गणेश चव्हाण यांच्या पश्चात गर्भवती पत्नी, तीन लहान मूल, दोन विवाहित बहिणी असा परिवार असल्याची चर्चा रुग्णालयात जमलेल्या नातेवाईकांत होत होती.
अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे झाला अपघात ?
गंगाखेड परभणी (Gangakhed Police) रस्त्यावरील खळी पाटीजवळ झालेल्या दुचाकी अपघातात (Gangakhed Accident) मानवत येथील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एमएच २२ एटी ८८७७ क्रमांकाच्या अपघात झाल्याने दुचाकीचा चुराडा झाल्याचे घटनास्थळी जमलेल्या नागरिकांतून बोलल्या जात होते.