परभणीतील गंगाखेड शहरातील होळकर चौक परिसरात
परभणी/गंगाखेड (Gangakhed Accident) : भरधाव वेगाने धावणाऱ्या दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी (Gangakhed Accident) झालेल्या जनार्धन शेप या दूध विक्रेत्याचा बुधवार २५ सप्टेंबर रोजी रात्री उशिराने परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात (Parbhani Hospital) उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरापासून जवळच असलेल्या भेंडेवाडी येथील जनार्धन गणपतराव शेप वय ४५ वर्ष हे नेहमी प्रमाणे दि. २१ सप्टेंबर शनिवार रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गंगाखेड शहरातील होळकर चौक परिसरात दूध विक्रीसाठी रस्त्याच्या बाजूला थांबलेले असताना एमएच २२ एई ४२५५ क्रमांकाच्या दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवून जनार्धन गणपतराव शेप यांना जोराची धडक दिली व दुचाकी चालकाने दुचाकी जागीच सोडून फरार झाला.
या (Gangakhed Accident) अपघातात गंभीर जखमी झालेल्या जनार्धन गणपतराव शेप यांना दामोधर दादाराव भेंडेकर यांनी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून त्यांना (Parbhani Hospital) परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. येथे उपचार सुरू असताना बुधवार रोजी रात्री अंदाजे साडे अकरा वाजेच्या सुमारास जनार्धन गणपतराव शेप यांचा मृत्यु झाला आहे. याप्रकरणी (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.