परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील सूनेगाव पाटीजवळ
परभणी/गंगाखेड (Gangakhed Accident) : प्रवाशाला लघवी आल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बसला छोटा हत्ती वाहनाच्या चालकाने पाठीमागून धडक दिल्याने चालक जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी बस चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार येथून पंढरपूरकडे जाणारी बस ही पहाटे ३ वाजेच्या सुमारास गंगाखेड तालुक्यातील सूनेगाव पाटीजवळ आली तेंव्हा प्रवाशाला लघवी आल्यामुळे बस चालकाने रस्त्याच्या बाजूला बस थांबविली असता, (Gangakhed Accident) पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या छोटा हत्ती वाहनच्या चालकाने बसला पाठीमागून जोराची धडक दिली.
छोटा हत्ती चालक मारोती प्रल्हाद ढगे वय ३० वर्ष राहणार पिंपळा ता. लोहा जिल्हा नांदेड हा गंभीर जखमी झाला. (Gangakhed Accident) बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बस चालक दत्ता देविदास जामोदकर रा. चांदुर बाजार आगार जिल्हा अमरावती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून छोटा हत्ती चालक मारोती ढगे याच्या विरुद्ध (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास जमादार दिपककुमार व्हावळे हे करीत आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.