आ. जयंत पाटील यांच्याकडे कार्यकर्त्यांची मागणी
परभणी (Gangakhed Assembly Constituency) : जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदार संघावर माजी आ.सिताराम घनदाट (Sitaram Ghandat) यांच्याकडून दावा करण्यात आला असून गंगाखेड, पुर्णा, पालम तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आ.जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गटाला उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
परभणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गटाचा निष्टावंतांचा मेळावा शुक्रवार २६ जुलै रोजी पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गंगाखेड विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये मतदार संघातील गंगाखेड, पुर्णा, पालम तालुक्यातील तालुकाध्यक्ष, पदाधिकार्यांनी माजी आ. सिताराम घनदाट यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. आ. घनदाट (Sitaram Ghandat) यांनी मतदार संघाचे तीन वेळेस प्रतिनिधीत्व केले असून त्यांनी विकासाची विविध कामे पुर्ण केली आहेत.
माजी आ. घनदाट यांनी तीन वेळेस केले आहे प्रतिनिधीत्व
मतदार संघात सामाजिक उपक्रमांमधून गरजूंना मदत करणे, अभ्यूदय बँकेच्या माध्यमातून कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देणे, विविध शाळा, संस्थांना त्यांच्या काळात मान्यता मिळवून देणे आदी कामे केली आहेत. मतदार संघात कार्यकर्त्यांना जपणारा माणूस म्हणून त्यांची ओळख असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले. सध्या या मतदार संघात महायुतीच्या आमदार असल्याने महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गटाने निवडणूक लढविल्यास विजय मिळणार असल्याचा कार्यकर्त्यांनी दावा केला. आ.घनदाट यांनी त्यांच्या कार्याकाळात अपक्ष निवडून येत केलेला विकास आणि सामाजिक उपक्रमांमुळे मतदार संघातील सर्वांना ते परिचित आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून माजी आ. घनदाट (Sitaram Ghandat) यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी जयंत पाटलांकडे (Jayant Patil) केल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे जाहिर केले.
चौधरी, निरस यांच्या पक्ष प्रवेशाने ताकद वाढली
गंगाखेड न.पा.चे माजी सभापती बाळकाका चौधरी, कृ.उ.बा,चे सभापती बाळासाहेब निरस, सुशांत चौधरी यांनी रा.कॉ.मध्ये पक्ष प्रवेश केल्याने (Gangakhed Assembly) गंगाखेड शहरात पक्षाची ताकद वाढल्याची दावा कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.