आळंदीला जाणाऱ्या भक्तांनी घेतला रात्री संत जनाबाई मंदिराचा आधार
परभणी/गंगाखेड (Gangakhed Bus Stand) : आळंदी येथे दर्शनाला जाण्यासाठी गंगाखेड तालुका (Maharashtra State Transport) व परिसरातून निघालेल्या प्रवाशांना नांदेड पुणे बसच्या वाहकाने प्रवेश नाकारल्याने रात्र काढण्यासाठी या प्रवासी भक्तांना गंगाखेड बस स्थानकाऐवजी संत जनाबाई मंदिराचा आधार घ्यावा लागल्याची घटना रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली.
प्रवाशांना चक्क प्रवेश देण्यास वाहकाचा नकार
माहितीनुसार, गंगाखेड येथून पुणे जाण्यासाठी रात्री १०:१५ वाजता नांदेड आगाराची नांदेड ते पुणे (शयनयान) बस ही शेवटची बस आहे. (Maharashtra State Transport) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या या बसने पुणे, आळंदी येथे जाण्यासाठी दरदिवशी गंगाखेड बस स्थानकावरून प्रवासी आपला प्रवास करतात मात्र दि. २५ जून मंगळवार रोजी रात्री अंदाजे १०:२० वाजेच्या सुमारास गंगाखेड बस स्थानकावर आलेल्या नांदेड पुणे बसच्या (क्रमांक एमएच १४ बीएल ०७४२) वाहकाने गंगाखेड येथून आळंदीला जाण्यासाठी बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना बसचे तिकीट आरक्षित केले आहे का ? तुमचं नाव काय गाव कोणत असे विचारत बसमध्ये प्रवेश नाकारत तिकीट आरक्षित केले असेल तरच बसमध्ये चढा असे म्हणत आळंदी येथे दर्शनाला जाण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या १) पिराजी धोंडीबा पांढरे वय ७८ वर्ष, २) तातेराव संभाजी मानगिर वय ७५ वर्ष दोघे रा. पांढरेवाडी ता. गंगाखेड, ३) छबू लक्ष्मण मोहिते वय ७८ वर्ष रा. महागाव तालुका पुर्णा, ४) माणिकराव नरसिंग गाडे वय ७६ वर्ष, ५) मुद्रिकाबाई नारायण भुतापल्ले वय ७५ वर्ष, ६) पंचफुलाबाई कोंडीबा भुतापल्ले वय ७५ वर्ष, ७) वृंदावन माणिक गाडे वय ७५ वर्ष चौघे रा. सादलापुर ता. पालम, ८) पंडीत जयवंतराव डुमनर वय ७५ वर्ष रा. डुमनरवाडी ता. गंगाखेड, ९) रुक्मिणी देविदास महात्मे वय २७ वर्ष रा. नायगाव जि. नांदेड व त्यांच्या सोबत चार वर्षाचा लहान मुलगा तसेच लांडकवाडी ता. पालम, मरगळवाडी ता. गंगाखेड येथील अन्य काही प्रवाशांना बसमध्ये न घेताच बस स्थानकावर सोडून निघून गेल्याने व पुणे येथे जाणारी ही शेवटची बस असल्याने या प्रवासी वर्गातून बस वाहक व चालक यांच्या या भूमिकेबद्दल प्रचंड संताप व्यक्त केल्या जात होता.
ग्रामीण भागातून आलेल्या या प्रवाशांना (Gangakhed Bus Stand) गंगाखेड बस स्थानकावरून आळंदी येथे जाण्यासाठी रात्रीच्या वेळी कोणतीच सुविधा नसल्याने लांडकवाडी व मरगळवाडी येथील काही प्रवासी परत गावी गेले तर गावी परत जाण्यासाठी किंवा आळंदीला जाण्यासाठी कोणतेच वाहन नसल्याने पांढरेवाडी, महागाव, सादलापुर, डूमनरवाडी, नाय गाव येथील प्रवासी गंगाखेड बस स्थानकावरच थांबले. गंगाखेड बस स्थानक इमारतीचे काम सुरू असल्याने पत्र्याचे शेडमध्ये असलेल्या तात्पुरत्या बस स्थानकात थांबण्यास भीती वाटत असल्याने व येथे कार्यरत वाचमॅन घोरपडे यांनी बस स्थानक परिसरातील आगाराच्या प्रवेशद्वारावर त्यांना बसू न दिल्याने हरी जाधव, बालाजी कातकडे, मंगेश आंधळे, अनिकेत मडके यांनी त्यांना संत जनाबाई मंदिराकडे नेऊन सोडले. आळंदीला दर्शनासाठी निघालेल्या प्रवाशांना नांदेड पुणे बसच्या वाहकाने बस मध्ये प्रवेश नाकारल्याने या दहा प्रवाशांना रात्र काढण्यासाठी संत जनाबाई मंदिराचा आधार घेऊन सकाळी सहा वाजता गंगाखेड पुणे बस ने आळंदी ला जावे लागल्याने या प्रवाशंतून प्रचंड संताप व्यक्त करत गंगाखेड येथील आगार प्रमुखांनी नांदेड येथील आगार प्रमुखांशी संपर्क साधून नांदेड पुणे बसमध्ये (Gangakhed city) गंगाखेड येथील प्रवाशांना प्रवेश द्यावा, अशी विनंती करत प्रवाशांची गैरसोय टाळावी, अशी मागणी केली आहे.