गंगाखेड शहरातील घटना, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
गंगाखेड (Parbhani) : शहरातील संत जनाबाई नगर परिसरात राहणाऱ्या एका १९ वर्षीय युवतीच्या (Girl suicide Case) घरी जाऊन तिचे मोबाईलवरील अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वडिलांकडे दोन लाख रुपयांची मागणी करत शिवीगाळ केल्याने बदनामीच्या भितीपोटी युवतीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या (Girl suicide Case) केल्याची घटना आज पहाटे सहा वाजेपूर्वी घडली. याप्रकरणी (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध विनयभंग, खंडणी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, (Gangakhed city) गंगाखेड शहरातील संत जनाबाई नगर परिसरात राहणाऱ्या एका १९ वर्षीय युवतीचे मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ असल्याचे सांगत सचिन हजारे नामक इसम व त्याची पत्नी निर्मला हजारे, हे रात्री ८ वाजेच्या सुमारास युवतीच्या घरी जाऊन तुमच्या मुलीचे माझ्याकडे अश्लील व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ मी (social media) सोशल मीडियावर व्हायरल करील. व्हिडिओ व्हायरल करायचे नसतील तर दोन लाख रुपये द्या, असे सचिन हजारे व त्याच्या पत्नीने फिर्यादीस त्याच्या पत्नी तसेच मुलीसमोर म्हटल्याने माझ्याकडे पैसे नाहीत. मी पैसे देऊ शकत नाही तू हा व्हिडिओ डिलीट करून टाक असे युवतीच्या पित्याने म्हटल्याने सचिन हजारे व त्याची पत्नी शिवीगाळ करून निघून गेले.
त्यानंतर रात्री ९:३० वाजेच्या सुमारास परत आलेल्या सचिन हजारे व त्याच्या पत्नीने युवतीच्या घरी येऊन हा व्हिडीओ रवि ससाणे याने बनवून पाठविला आहे आणि तो व्हायरल करायचा नसेल तर दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हटल्याने पिडीत युवती व तिच्या आईसमोर त्यांच्यामध्ये वाद झाला. सचिन हजारे व त्याची पत्नी तेथून निघून गेल्यानंतर युवतीच्या पित्याने काय घडलं याबाबत युवतीला विचारणा केली. रात्री सर्व झोपी गेल्यानंतर आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास शौचास जाते, म्हणून गेलेल्या युवतीने छतावरील घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या (Girl suicide Case) घटनेची माहिती समजताच (Parbhani Police) पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी शिवरकर, जमादार सुंदर शहाणे, पोलीस शिपाई राम पडघन यांनी संत जनाबाई नगर परिसरात जाऊन परिसरातील नागरिकांच्या मदतीने मयत युवतीचा गळफास काढून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (Gangakhed Hospital) गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी (Girl suicide Case) मृतक युवतीच्या पित्याने दिलेल्या तक्रारीवरून प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याप्रकरणी (Girl suicide Case) जबाबदार असलेल्या सचिन हजारे, निर्मला हजारे व रवि ससाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका युवतीच्या पित्यासह अन्य नातेवाईकांनी घेतल्यामुळे पिडीत युवतीच्या पित्याने दिलेल्या तक्रारीवरून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन लाख रुपये खंडणी मागत (Girl suicide Case) युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वरील तिघांविरुद्ध ठाणे अंमलदार सपोउपनि कालिदास आंबट, दत्तराव चव्हाण यांनी सायंकाळी ६ वाजेच्यां सुमारास गुन्हा दाखल केला. याचा पुढील तपास (Parbhani Police) सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी शिवरकर, पोलीस शिपाई राजू परसोडे हे करीत असून सचिन हजारे व त्याची पत्नी निर्मला हजारे या दोघांना अटक करण्यात आली आहे.