प्रशासन लागले कामाला
परभणी/गंगाखेड (Gangakhed city) : शहरातील वाहतुक कोंडीवर कायमची उपाय योजना करण्यासाठी पोलीस, नगर परिषद व महसूल प्रशासन सज्ज झाले असुन गंगाखेड शहराची वाहतुक कोंडीतुन लवकरच सुटका होणार असल्याचे बोलल्या जात आहे.
वाढत्या वाहन संख्येमुळे व शहरातील अपुऱ्या रस्त्यांमुळे (Gangakhed city) गंगाखेड शहरातील व्यापार पेठेत नेहमीच वाहतूक कोंडी होऊन रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने मुंबई, पुणेसारख्या मेट्रो सिटीत असल्याचा भास नागरिकांना होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस प्रशासनासह नगर परिषद प्रशासनाने उपाय योजना करण्यासाठी व्यापारी, हातगाडा चालक, भाजीपाला व फळ विक्रेते यांच्यासह शहरातील ऑटो चालकांच्या संयुक्त बैठका घेतल्या पण शहरातील वाहतुक कोंडी सुटण्याची काही चिन्ह दिसत नसल्याने गुरुवार दि. १९ डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्यासह नगर परिषदेचे कार्यालयीन अधिक्षक मो. अफजलोद्दीन, शिवाजी हजारे आदींनी शहरात ठिकठिकाणी भेटी देऊन ग्रामीण भागातुन येणाऱ्या प्रवाशी ऑटोसाठी पार्किंगसाठी सुरक्षीत जागेची पाहणी केली.
ग्रामीण भागातून शहरात (Gangakhed city) येणाऱ्या ऑटो व चारचाकी वाहनांना पार्किंगकरिता जागा उपलब्ध करून दिली तर शहरातील वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होईल अशा पद्धतीने शहराच्या चार ही बाजूला पार्किंगची व्यवस्था करुन दिली जाणार आहे. यासाठी देवळे जिनींग डिपी रोड परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील मोकळी जागा, मासोळी कॅंप, शासकिय रुग्णालय कर्मचारी वसाहत आदी ठिकाणी व्यवस्था केली जाऊ शकते का याची चाचपणी अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी केल्यावरून शहरातील वाहतुक समस्या सोडविण्यासाठी पोलीस, नगर परिषद व महसूल प्रशासन सरसावल्याचे बोलल्या जात असुन लवकरच या वाहतूक कोंडीतुन शहरवासीयांची सुटका होणार असल्याचा आशावाद शहर वासिय बाळगत आहे.
लवकरच संयुक्त बैठक
शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहरातील काही खाजगी जागा व काही ठिकाणी असलेल्या शासकीय मालकीच्या जागा संबंधी चर्चा करण्यासाठी लवकरच संबंधित विभागाच्या प्रमुखांची संयुक्त बैठक घेऊन काही अटी शर्ती ठरवुन त्या जागेवर पार्किंग व्यवस्था करण्यात येईल असे उपविभागीय अधिकारी तथा नगर परिषदेचे प्रशासक जिवराज डापकर यांनी सांगितले.