परभणीच्या गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
परभणी (Gangakhed Crime) : गंगाखेड ते मालेवाडी रस्त्यावर असलेल्या गंगोत्री आश्रम येथे एका महिला भक्तावर महाराजाने जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याची घटना २०२१ मध्ये घडली. या प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन ८ ऑगस्ट रोजी ज्ञानोबा मुगाजी कराळे उर्फ माऊली महाराज मुडेकर याच्यावर (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भक्तांकडून हा गुन्हा खोटा दाखल (Gangakhed Crime) झाला असल्याचे सांगितले जात असून योग्य तपास करण्याची मागणी केली जात आहे.
योग्य तपास करण्याची भक्तांची मागणी
२५ वर्षीय पिडितेने या बाबत तक्रार दिली आहे. सन २०२१ मध्ये गुरु पौर्णिमेच्या दिवशी पिडिता पती सोबत गंगोत्री आश्रम येथे महाराजांकडे गेली होती. यावेळी महाराजाने पतीला थंडपेय आणण्यासाठी पाठविले. त्यानंतर पिडिता पाया पडत असताना महाराजाने बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. आश्रमात भोंग्याचा आवाज असल्याने तिच्या मदतीला कोणी आले नाही. पती आल्यानंतर पिडितेने घडला प्रकार सांगितला. मात्र पतीला विश्वास बसला नाही. त्यानंतर ४ ऑक्टोबर २०२१ मध्ये महाराज पिडितेच्या घरी आले. यावेळी त्यांनी पिडितेचा विनयभंग केला.
या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रिकरण करण्यात आले. घडला प्रकार पिडितेने इतर महाराजांना बोलावून सांगितला. त्यानंतर मुडेकर महाराज यांना समज देण्यात आली. पिडितेने घडला प्रकार सासु – सासर्याला सांगितल्यावर त्यांनी पाठिंबा दिल्याने या बाबत गंगाखेड पोलीस ठाण्यात ८ ऑगस्ट २०२४ रोजी ज्ञानोबा मुगाजी कराळे उर्फ माऊली महाराज मुडेकर यांच्याविरुध्द तक्रार देण्यात आली आहे. (Gangakhed Police) पोलीस तपास करत आहेत.
पिडितेच्या पतीसोबतही अश्लिल वर्तन
पिडितेचे पती आश्रमामध्ये महाराजांच्या सेवेसाठी जात होते. एकेदिवशी महाराजांचे अंग दाबत असताना माऊली महाराज मुडेकर यांनी पिडितेच्या पतीसोबतही अश्लिल वर्तन केले. घडला प्रकार पतीने पत्नीला सांगितला. पतीलाही पत्नीसोबत काही वाईट झाले आहे, या बाबत खात्री पटली.