परभणी/गंगाखेड (Gangakhed Crime) : सोशल मीडियावरील पोस्टवरून दोन समाजातील तरुणांत वाद झाल्याने शुक्रवार रोजी रात्री गंगाखेड शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत शांतता राखण्याचे आवाहन करत दोषीवर (Gangakhed Crime) गुन्हा दाखल केल्यामुळे शहरातील वातावरण शांत झाले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केला होता आव्हान
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, (Gangakhed Crime) गंगाखेड शहरातील नगरेश्वर गल्लीतील रहिवासी अभिषेक उमा खवडे या तरुणाने त्याच्या इंस्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर संभाजी महाराज यांचे हातात तलवार व त्यांचे पायाखाली आरंगजेबाचा फोटो असलेली व त्याखाली औरंग्याच्या आवलादिंनो तुम्ही कितीही भुंकलात तरी तुमच्या नाजाइस बापाची माझ्या राजाच्या समोर हीच लायकी आहे असा फोटो व गाणे असलेली रिल्स स्टोरी ठेवली असता आयान, रिजवान, फैजल पुर्ण नाव माहित नाही.
परभणीतील गंगाखेड शहरात निर्माण झाला तेढ
इतर ४ ते ५ जणांनी शुक्रवार २१ मार्च रोजीचे रात्री ८:३० वाजेच्या सुमारास गैरकायद्याची मंडळी जमवुन अभिषेक उमा खवडे यास स्टोरी का ठेवलीस असे म्हणुन लाथा बुक्यांनी मारहाण केली व तु मला खेटायचे तर खेट असे म्हणुन (Gangakhed Crime) धमकी दिल्याची फिर्याद अभिषेक उमा खवडे वय २२ वर्षे रा. नगरेश्वर गल्ली याने दिल्यावरून मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास १) आयान, २) रिजवान, ३) फैजल पुर्ण नाव माहित नाही व इतर ४ ते ५ जण सर्व रा. राजमोहल्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास पोउपनि विशाल बुधोडकर करीत आहे.
शांतता राखण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन
घटनेची माहिती समजताच परिविक्षाधीन सहा. पो. अ. ऋषिकेश शिंदे यांनी तातडीने राजमोहल्ला व नगरेश्वर गल्लीकडे धाव (Gangakhed Crime) घेत रस्त्यावर जमत असलेल्या तरुणांना शांतता राखण्याचे आवाहन करत पांगविले. त्यानंतर रात्री उशिराने पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड आदींनी गंगाखेड शहराला भेट देत गस्त केली.