शहरातील डॉक्टर लेन व रेल्वे स्थानक परिसरातून दोन दुचाकीची चोरी
परभणी/गंगाखेड (Gangakhed Crime) : शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोरांसह दुचाकी चोरांनी (Gangakhed theft) चांगलाच धुमाकूळ घातला असून शहर व परिसरात दुचाकी चोरीचे सत्र थांबता थांबत नसल्याने भुरट्या चोरांनी (Gangakhed Police) पोलीस प्रशासनालाच आवाहन देत डॉक्टर लेन व रेल्वे स्थानक परिसरातून दोन दुचाकीची चोरी केल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत माहितीनुसार, भरत भाऊराव ढगे वय ३२ वर्ष रा. पिंपळगाव ता. परभणी हे दि. २५ जुलै रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास त्यांच्या जवळील काळ्या रंगाची स्पलेंडर दुचाकी क्रमांक एम.एच. २२ बी.बी. ५४५२ गंगाखेड शहरातील डॉक्टर लेनमधील एका रुग्णालयासमोर लाऊन रुग्णालयात गेले असता अवघ्या २० मिनिटाच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने दवाखान्यासमोर लावलेली त्यांची दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी (Gangakhed Crime) त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. २९ जुलै सोमवार रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत संत जनाबाई नगरातील रहिवासी सिताराम बाबुराव केंद्रे वय ३८ वर्ष यांनी त्यांच्या जवळील हिरो कंपनीची फॅशन प्रो दुचाकी क्रमांक एम.एच. २२ ए.जे. ०७५४ ही दि. २६ जुलै शुक्रवार रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गंगाखेड रेल्वे स्थानकावरील पत्र्याच्या शेडमधील पार्किंगमध्ये लाऊन काही कामानिमित्त परभणी येथे गेले. रात्री ८ वाजेच्या सुमारास ते परभणी येथून परत आले असता त्यांना त्यांची काळ्या रंगाची, ग्रे रंगाचे पट्टे असलेली दुचाकी आढळून आली नाही. दोन दिवस दुचाकीचा सर्वत्र शोध घेऊन ही दुचाकी मिळून न आल्याने सिताराम केंद्रे यांनी दि. २८ जुलै रविवार रोजी सकाळी (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ठाणे अंमलदार मोतीराम साळवे, हरीश बनसोडे यांनी अज्ञात दुचाकी चोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल (Gangakhed Crime) करत तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक युसुफ खान पठाण यांच्याकडे दिला आहे.
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या दुचाकी चोरी व घरफोडी, वाहनातील डिझेल, पेट्रोल चोरी व अन्य चोरीच्या घटनांमुळे पोलीसांच्या कार्य शैलीवरच नागरिकांतून प्रश्न उपस्थित केले जात असून भेंडेवाडी येथे वृध्द महिलेवर चाकू हल्ला करून सोन्याची पोत पळविणाऱ्या व वृद्धेचा खून करणाऱ्या तसेच गोदावरी नदी पात्रात मिळून आलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची अद्यापपर्यंत कसलीही ओळख पटली नसल्याने अज्ञात कारणावरून जिवे मारून अंदाजे पंचवीस ते तीस वर्षीय तरुणाचे पाय बांधत पोटाला दगड बांधून पाण्यात मृतदेह टाकणाऱ्या मारेकऱ्यांचा शोध अद्याप लागला नसल्याने गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी (Gangakhed Crime) वाढलेली असतांना (Gangakhed Police) पोलीस ठाण्यात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत पोलीस अधिकारी, कर्मचारी करतात तरी काय असा प्रश्न गंगाखेड शहर व परिसरातील नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.