सहा जणांविरुद्ध परभणीतील गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
परभणी/गंगाखेड (Gangakhed Crime Case) : दवाखाना टाकण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आण म्हणत विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या मंडळीविरुद्ध विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवार १४ नोव्हेंबर रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात (Gangakhed Crime Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगाखेड तालुक्यातील नरळद येथील प्रज्ञा खजे यांचा विवाह २८ जून २०२१ रोजी पोत्रा ता. कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील पांडुरंग रमाकांत मुलगीर यांच्या सोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवस चांगले नांदवीत पती पांडुरंग रमाकांत मुलगीर, सासरा रमाकांत उत्तमराव मुलगीर, सासू नंदाबाई रमाकांत मुलगीर, भाया सुधीर रमाकांत मुलगीर, भाया सुशील रमाकांत मुलगीर, जाऊ मेघा सुशील मुलगीर सर्व रा. पोत्रा ता. कळमनुरी यांनी शारीरिक व (Gangakhed Crime Case) मानसिक छळ करत त्रास देण्यास सुरुवात केली. मार्च २०२२मध्ये पती ड्युटीवर असलेल्या उमरखेड येथे पती, सासू, सासरे यांच्या सोबत राहण्यास गेल्यानंतर तेथे ही पती, सासू, सासऱ्यांनी त्रास देत एकटीला घरी सोडून निघून आले.
ही बाब माहेरी सांगितली, तेंव्हा सासरी आलेल्या आई व काकांनी मध्यस्थी करून पती व सासरच्या मंडळीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता तुमच्या मुलीला नांदवायला पाठवायचे असेल तर दवाखाना टाकण्यासाठी दहा लाख रुपये द्या नाहीतर फुकट फारकत द्या असे म्हणून माहेरच्या लोकांना अपमानीत करून हाकलून दिल्याची फिर्याद एप्रिल २०२२ पासून माहेरी राहत असलेल्या प्रज्ञा पांडुरंग मुलगीर वय २७ वर्ष रा. पोत्रा ता. कळमनुरी जिल्हा हिंगोली ह. मु. नरळद ता. (Gangakhed Crime Case) गंगाखेड यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्यावरून सासरच्या मंडळीविरुद्ध माहेरहून दहा लाख रुपये आण म्हणत शिवीगाळ करून चापट बुक्क्यानी मारहाण करीत शारीरिक व मानसिक त्रास देत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास जमादार संभाजी शिंदे हे करीत आहेत.