परभणी/गंगाखेड (Gangakhed crime) : घरासमोर झाडत असलेल्या विवाहितेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करत शेजारी राहणाऱ्या इसमाने तिच्या सासू व मुलास मारहाण केल्याची घटना दिनांक ४ मे शनिवार रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तालुक्यातील दगडवाडी तांड्यावर घडली आहे. याप्रकरणी गंगाखेड गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दगडवाडी तांड्यावरील घटना
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, (Gangakhed taluka) गंगाखेड तालुक्यातील दगडवाडी तांड्यावरील ३४ वर्षे विवाहिता दिनांक ४ मे शनिवार रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तिच्या घरासमोर झाड लोट करीत असताना शेजारी राहणाऱ्या उत्तम शंकर पवार यांनी तू अंगणात का झाडात आहे. तुझ्या अंगणातील कचरा व धूळ माझ्या घरात येत आहे, असे विवाहितेस म्हटल्याने, हे माझे अंगण आहे. मी झाडेल नाही तर काही करेल, तू मला का सांगतो, असे म्हणून विवाहिता घरात गेली. उत्तम पवार याने तिच्या पाठीमागे घरात घुसून उजवा हात धरून ओढला.
विवाहितेच्या कमरेला दुखापत
यावेळी विवाहितेचा मुलगा येताच हात सोडून देत खाली जमिनीवर आढळले. यामुळे विवाहितेच्या कमरेला दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद करून याचवेळी घरात आलेल्या फिर्यादी विवाहितेच्या सासूने भांडण सोडवायचा प्रयत्न केला. उत्तम पवार याने दगडाने तिच्या हाताच्या कोपरावर मारून दुखापत केली. मुलास चापट बुक्क्यांनी मारहाण करीत त्याचे डोके भिंतीवर आढळून मुक्कामार देत विवाहितेला अश्लील भाषेत शिवीगाळ करून माझ्या नादी लागली तर, जीवे मारून टाकतो अशी धमकी दिल्याची तक्रार विवाहितेने (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्यावरून उत्तम शंकर पवार याच्याविरुद्ध घरात घुसून विनयभंग करत मारहाण करून जखमी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास (Gangakhed Police) बीट जमादार मुंजा वाघमारे हे करीत आहे.