परभणी/गंगाखेड (Gangakhed Crime) : जमिनीचा ताबा घेण्यावरून दिनांक २५ मे शनिवार रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील परळी रस्त्यावर समद जिनिंग परिसरात दोन गटात झालेल्या वादात एका गटातील दोघे जखमी झाल्याची घटना घडली आहे. या (Gangakhed Crime) घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यासाठी मोठा जमाव पोलीस ठाण्यात जमल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी रविवार रोजीच्या पहाटे (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, गंगाखेड परिसरात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे येथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न झाल्याचे नागरिकांतून बोलल्या आहे.
जमिनीचा ताबा घेण्यावरून गंगाखेड येथे दोन गटात वाद, दोघे जखमी
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड शहरातील (Gangakhed taluka) परळी रस्त्यावर असलेल्या शेत सर्व्हे नंबर ४२८/१/२ मध्ये फजरूल रहमान अब्दुल समद यांची सामाईक बारा एकर जमीन असून जमिनीच्या पश्चिमेकडील बाजूने असलेल्या शेत जमिनीवर इंतेसार सिद्दीकी व भैय्या चाऊस यांनी तिघा व्यक्तींच्या नावाचा बोर्ड लावून कब्जा (ताबा) केल्याने दिनांक २५ मे शनिवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास फिर्यादी आयान मो. गौस पाशा हे व त्यांचे सोबत कुरेशी मोहम्मद फयाज, अक्रम मो. गौस पाशा, अनिश, खदिर शेरु कुरेशी, जुबेर खदिर कुरेशी आदी परळी रस्त्यावर एका हॉटेल समोरील सार्वजनिक रस्त्यावर असताना इंतेसार सिद्दीकी व भैय्या चाऊस या दोघांनी फिर्यादीस अश्लील भाषेत शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. इंतेसार सिद्दीकी याने त्याच्या हातातील खंजीरच्या मुठीने फिर्यादी अयान महमद गौस पाशा यांच्या तोंडावर उजव्या बाजूस मारहाण करून जखमी केले तेंव्हा कुरेशी मोहम्मद फयाज हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना सुद्धा वरील लोकांनी पोटात, पाठीत मारहाण केली व तुम्ही जर परत या जमिनीकडे येसाल तर तुमचे तुकडे करून तुम्हाला खतम करून टाकू असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद (Parbhani Hospitals) परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अयान मोहम्मद गौस पाशा रा. जैंदीपुरा यांनी दिल्याने रविवार रोजीच्या पहाटे इंतेसार सिद्दीकी, भैया चाऊस यांच्यासह इतर २५ ते ३० जंणावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाणे परिसरात जमला मोठा जमाव
जमिनीच्या वादातून परळी रस्त्यावर समद जिनिंग परिसरात मारहाण झाल्याची घटना घडल्याची माहिती समजताच याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासाठी शहरातील असंख्य नागरिकांचा जमाव पोलीस ठाणे परिसरात जमा झाला होता. शनिवार रोजी रात्री मोठ्या प्रमाणात जमलेल्या जमावामुळे पोलीस ठाणे व उपजिल्हा रुग्णालय परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गंगाखेड पोलीस ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याचे समजताच खा. संजय जाधव यांनी पोलीस ठाण्यास भेट देवून, या प्रकरणात (Gangakhed Police) पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून घेत अन्याय झालेल्यांना न्याय देण्याचे आवाहन पोलीसांना केले.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न झाला निर्माण
गंगाखेड शहर (Gangakhed taluka) व परिसरात दिवसेंदिवस घडणाऱ्या अनेक प्रकारच्या गंभीर घटनांमुळे शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न झाल्याचे शहर व परिसरातील नागरिकांतून केला जात आहे.
आमदाराचे नाव घेऊन कब्जा करण्याचा प्रयत्न
स्थानिक आमदाराचे नाव घेऊन काही जण आमच्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार गंगाखेड तहसील कार्यालयात तसेच जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय गंगाखेड व जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय परभणी यांच्याकडे दिनांक २४ मे शुक्रवार रोजी दाखल केल्याचे फजरूल रहमान यांनी दैनिक देशोन्नतीशी बोलताना सांगितले.