सोन्याची पोत पळविली, भेंडेवाडी येथील घटना
परभणी/गंगाखेड (Gangakhed Crime) : घराबाहेर अंगणात झोपलेल्या वृध्द महिलेस चोरट्यांनी चाकूने मारहाण करून गंभीर जखमी करत गळ्यातील सोन्याची पोत पळविल्याची घटना दि. १८ जुलै गुरुवार रोजीच्या पहाटे २ वाजेच्या सुमारास गंगाखेड तालुक्यातील मौजे भेंडेवाडी येथे घडली. याप्रकरणी (Gangakhed Police) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील मौजे भेंडेवाडी येथील लक्ष्मीबाई मुंजाजी शेप वय अंदाजे ८० वर्ष या दि. १७ जुलै बुधवार रोजी रात्री घराबाहेर अंगणात झोपलेल्या असतांना मध्यरात्री अंदाजे २ वाजेच्या सुमारास गावात आलेल्या (Gangakhed Crime) चोरट्यांनी त्यांच्या घराजवळील शेजाऱ्यांच्या घरांना बाहेरून कडी कोंडे लावत आजूबाजूची लाईट बंद करून कुत्र्यांसमोर काहीतरी खायला टाकून लक्ष्मीबाई शेप यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढण्याचा प्रयत्न केला तेंव्हा झोपेतून जागे झालेल्या लक्ष्मीबाई शेप यांनी विरोध करताच तोंडाला कपडा बांधलेल्या चोरट्यांनी चाकूने त्यांच्या तोंडावर आणि डोक्यात चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत काढून घेतली.
गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मीबाई शेप यांनी आरडा ओरडा केल्याने चोरट्यांनी पळ काढला. (Gangakhed Crime) रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लक्ष्मीबाई शेप यांना पहाटे ३ वाजेच्या सुमारास उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिंक्य मुळे, परिचारिका संगिता लटपटे, उषा इधाटे आदींनी त्यांच्यावर प्रथामोपचार केले. लातूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार सुरू असून घटनेची माहिती समजताच सहायक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर, जमादार संभाजी शिंदे, पोलीस नाईक एकनाथ आळसे, राजू परसोडे आदींनी पहाटे घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. गुरुवार रोजी सकाळी सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप गडदे यांच्यासह अंगुली मुद्रा ठसे पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राम मुंजे, जमादार बबन शिंदे, इंद्रजितसिंग बावरी, पो. शि. अनिल कोंगुलवार आदींनी भेट दिली. याप्रकरणी (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.