परभणीच्या निळानाईक तांडा जवळील घटना
परभणी/गंगाखेड (Gangakhed Crime) : पिंपळदरी मार्गे किनगावकडे रस्त्यावर निळानाईक तांड्याजवळ गुरुवार रोजी सायंकाळी ऑटोचा अपघात झाल्याने तरुणाचा मृत्यु (Gangakhed Crime) झाल्याची व पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड (Gangakhed Crime) येथून पिंपळदरी मार्गे किनगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिंपळदरी गावाजवळ असलेल्या निळानाईक तांड्याजवळील घाटाच्या उतारावर गुरुवार १२ डिसेंबर रोजी सायंकाळी अंदाजे ६ वाजेच्या सुमारास पिंपळदरीकडे जाणाऱ्या अँपे ऑटोचा अपघात झाल्याने या अपघातात चालक लहू प्रभू चव्हाण वय ३५ वर्षे, धानाबाई प्रभू चव्हाण ६५ वर्ष, शेवंताबाई सिताराम राठोड वय ७० वर्ष, बालासाहेब सिताराम राठोड वय ४५ वर्ष, भगवान गोपीनाथ चव्हाण वय ४० वर्ष, मनीषा लहू चव्हाण वय २७ वर्षे सर्व रा. शिवाजीनगर तांडा ता. गंगाखेड हे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच पिंपळदरी येथील तरुणानी (Gangakhed Crime) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतुन सर्व जखमीना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी मुंडे (गिते), आधिपरिचारिका प्रणिता शिंदे, सुमेधा नागरगोजे यांनी जखमीवर प्रथमोपचार केले. यातील लहू प्रभू चव्हाण, धानाबाई प्रभू चव्हाण, शेवंताबाई सिताराम राठोड यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड, अंबाजोगाई व परभणी येथे हलविण्यात आले. यात लहू प्रभू चव्हाण याचा मृत्यु झाला. मयत लहु प्रभु चव्हाण याच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, वृद्ध आई, वडील असा परिवार आहे. या घटनेमुळे शिवाजीनगर तांडा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.