परभणी/गंगाखेड (Gangakhed Crime) : दोन गटात झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील सात जण जखमी (Gangakhed Crime) झाल्याची घटना दि. १९ जून बुधवार रोजी रात्री अंदाजे १०:३० वाजेच्या सुमारास शहरातील नेहरू चौक परिसरात घडली. सर्व जखमींवर येथील (Gangakhed Hospital) उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी परभणी व अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलविण्यात आले. यातील चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितल्या जात आहे. या घटनेनंतर निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने नेहरू चौक परिसरात दंगा नियंत्रण पथकाची तुकडी तैनात केल्याने या परिसराला (Gangakhed Police) पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
नेहरू चौक परिसराला आले पोलीस छावणीचे स्वरूप
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, (Gangakhed Crime) गंगाखेड शहरातील नेहरू चौक परिसरात दि. १९ जून बुधवार रोजी रात्री अंदाजे १०:३० वाजेच्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये एका गटातील अरबाज खान शफी खान वय २४ वर्ष, खलील खान सत्तार खान वय ३५ वर्ष, शहबाज खान हय्या खान वय २२ वर्ष, जमील खान सत्तार खान वय ४५ वर्ष हे तर दुसऱ्या गटातील आक्रम खुरेशी वय ३४ वर्ष, आलम गौस पाशा खुरेशी वय २८ वर्ष व मो. आजम मो. गौस वय २६ वर्ष असे एकुण ७ जण जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी (Gangakhed Hospital) गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा टाके, डॉ. पि.आर. चट्टे, परिचारिका अंकिता कदम, दिपाली घुले, आकाश कागडा, दत्ता साबणे आदींनी प्रथमोपचार करून सर्व जखमींना पुढील उपचारासाठी परभणी व अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविले.
गंगाखेड शहरातील घटना; चौघांची प्रकृती गंभीर
यातील आरबाज खान शफी खान, खलील खान सत्तार खान, आक्रम खुरेशी व आलम खुरेशी या चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितल्या जात आहे. हाणामारीच्या घटनेची माहिती समजताच नेहरू चौक व (Gangakhed Hospital) उपजिल्हा रुग्णालय परिसरात मोठा जमाव जमा झाल्याने निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी (Gangakhed Police) उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवाड, पोलीस उपनिरीक्षक राणी भोंडवे, सहायक पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ आदोडे, जमादार मारोती माहोरे, जमादार मोतीराम साळवे, एकनाथ आळसे आदींनी उपजिल्हा रुग्णालयात तसेच घटनास्थळी भेट देऊन जमाव पांगवत नेहरू चौक परिसरात दंगा नियंत्रण पथकाची तुकडी तैनात केल्याने नेहरू चौक परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. (Gangakhed Crime) याप्रकरणी दोन्ही गटातील जखमींचे जवाब घेण्यासाठी पोलीस अधिकारी परभणी व अंबाजोगाईकडे रवाना झाल्याने दि. २० जून गुरुवार रोजी दुपारी ४:३० वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.