गंगाखेड (Gangakhed Crime) : घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर कागद पत्रे घेण्यासाठी तसेच मुलाला भेटण्यासाठी सासरी गेलेल्या विवाहितेला पती व सासरच्या अन्य लोकांनी विष पाजल्याची घटना दिनाक २९ में बुधवार रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास वडगाव येथे घडली. (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणीत वडगाव येथील घटना
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव स्टे. तालुका सोनपेठ येथील प्रिया गरड वय २७ वर्ष यांचा विवाह गावातीलच गोविंद रामभाऊ यादव यांच्या सोबत झाला होता. पती सोबत पटत नसल्यामुळे प्रिया गोविंद यादव यांनी सुमारे एक महिन्यापूर्वी न्यायालयात घटस्फोटासाठी दावा दाखल केला होता. दिनांक २९ मे बुधवार रोजी दुपारी ३:३०वाजेच्या सुमारास प्रिया गोविंद यादव या त्यांची कागदपत्रे घेण्यासाठी तसेच एक वर्षापासून पती सोबत राहत असलेल्या मुलास भेटण्यासाठी सासरी गेल्या व माझे कागदपत्रे आणि मुलास भेटू द्या असे त्यांनी घराबाहेर उभ्या असलेल्या पतीस म्हटले असता चल तुला कागदपत्रे देतो असे म्हणून हाताला धरून घरात नेले.
तेंव्हा माऊली बचाटे, नणंद सारिका रामेश्वर जाधव, नंदई रामेश्वर बालासाहेब जाधव, सासू महानंदा रामभाऊ यादव हे घरात होते. क्रिकेट खेळण्याच्या बॅटने पती गोविंद यादव यांनी मांडीवर मारल्याने प्रिया यादव या खाली पडताच सासूने केस धरून तू आमच्या घरात कशाला आलीस आम्ही तुला काही देणार नाही, असे म्हटले. तेंव्हा आज हिला जिवंत सोडायचे नाही असे म्हणत नणंद व नंदई यांनी खिडकीतला औषधाचा डब्बा आण असे पतीला म्हटले व त्याने खिडकीतला औषधाचा डब्बा आणेपर्यंत सासूने दोन्ही हात धरले, नणंदने केस व मुंडके दाबून धरले तर नंदई रामेश्वर जाधव आणि माऊली बचाटे यांनी दोन्ही पाय धरले.
तू मला व माझ्या परिवाराला खूप त्रास दिला आज तुला सोडणार नाही, असे म्हणत पती गोविंद यादव याने छातीवर बसून विवाहितेचे तोंड उघडून हातातील औषधाचा डब्बा तोंडात ओतला. त्यानंतर चक्कर आल्याचे पाहून सासरच्या लोकांनी प्रिया यादव यांना घराबाहेर काढले. चक्कर येऊन पतीच्या घरासमोर रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या प्रिया यादव यांना त्यांचा भाऊ अजय लिंबाजी गरड, आई विमलबाई लिंबाजी गरड यांनी (Gangakhed Hospital) उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची फिर्याद प्रिया गोविंद यादव वय २७ वर्ष रा. वडगाव स्टे. तालुका सोनपेठ ह.मु. शिवाजीनगर पुणे यांनी दिल्याने दिनांक ५ जून बुधवार रोजीच्या रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या एकूण पाच जणांविरुद्ध कलम ३२६, ३२८, १४३, १४७,१४९ व ५०६ अन्वये (Gangakhed Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.