परभणी/गंगाखेड (Gangakhed Crime) : घरासमोर येवून शिवीगाळ का करतो असे विचारल्याने ३० वर्षीय विवाहितेला जातीवाचक व अश्लील भाषेत शिवीगाळ करत वाईट हेतूने दोन्ही हात धरून विनयभंग (Gangakhed Crime) केल्याची घटना दिनांक १९ मे रविवार रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास शहरात घडली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गंगाखेड पोलीस (Gangakhed Police) ठाण्यात ॲट्रोंसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, गंगाखेड शहरातील राजू दत्ता दराडे नामक इसम दिनांक १९ मे रविवार रोजी रात्री ७:१५ वाजेच्या सुमारास तीस वर्षीय विवाहितेच्या घरासमोर जाऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करत असताना तू इथे शिवीगाळ का करतो असे विवाहितेने विचारले असता त्याने जाती वाचक शिवीगाळ केली. राजू दत्ता दराडे व शंकर दत्ता दराडे या दोघांनी वाईट हेतूने विवाहितेचे दोन्ही हात धरून विनयभंग (Gangakhed Crime) केला. राजू दराडे याने काठीने डाव्या हाताच्या मनगटाजवळ काठीने मारून जखमी केल्याची तसेच कमलबाई दत्ता दराडे हिने चापट बुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद विवाहितेने गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्याने वरील तिघांविरुद्ध अश्लील भाषेत जातीवाचक शिवीगाळ करून काठीने व चापट बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद विवाहितेने दिल्यावरून (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात विनयभंग करीत जातीवाचक तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी तिघांविरुद्ध ॲट्रोंसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास उविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे हे करीत आहेत.