सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल
परभणी/गंगाखेड (Gangakhed Crime) : हुंड्यातील राहिलेल्या तीस हजार रुपयांसाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून घराबाहेर काढल्याने शनिवार १५ मार्च रोजी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळीविरुद्ध (Gangakhed Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगाखेड शहरापासून जवळच असलेल्या मालेवाडी येथील भाग्यश्री हिचा विवाह ४ मे २०२२ रोजी कंधार तालुक्यातील दिग्रस खु. येथील प्रदीप शिवाजी सोनकांबळे याच्या सोबत झाला होता. लग्नानंतर ८ दिवस चांगले नांदवीले व तुझ्या आई, वडिलांनी हुंड्यातील राहिलेले ३० हजार रुपये का दिले नाहीत असे म्हणून पती प्रदीप सोनकांबळे, सासरा शिवाजी पांडुरंग सोनकांबळे, सासु शालूबाई शिवाजी सोनकांबळे यांनी विवाहितेला उपाशी पोटी ठेवून शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरु केले.
त्याचदरम्यान दिवाळीनिमित्त माहेरी जाऊ द्या असे विवाहितेने पतीस म्हटले असता तुझ्या बापाने उर्वरित हुंडा दिला नाही तुला जिवंत जाऊ देणार नाही असे म्हणत पती, सासू, सासरे यांनी नणंद सुमन उर्फ सुप्रिया सिद्धार्थ हंकारे रा. बोरगाव ता. लोहा, प्रतिक्षा संतोष डाळे रा. माळाकोळी ता. लोहा व मावस सासू कविता बालाजी परतवाघ रा. उजना ता. अहमदपूर यांना बोलावून घेतले १० ते १५ दिवस राहिलेल्या नणंद व मावस सासूने ही विवाहितेचा छळ केला. दि. २२ ऑक्टोबर २०२२ रोजी दोन्ही नणंदानी हात धरले तर सासूने थापडा मारल्या.
सासऱ्याने शिवीगाळ केली व पती प्रदीप सोनकांबळे याने घराबाहेर हाकलून दिले. त्यानंतर वेळोवेळी विनंती करून सुद्धा त्यांच्या वागण्यात काही बदल न झाल्याने भाग्यश्री प्रदीप सोनकांबळे वय २९ वर्ष रा. दिग्रस खु. ता कंधार ह. मु. मालेवाडी ता. गंगाखेड या विवाहितेने शनिवार १५ मार्च रोजी (Gangakhed Crime) गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासू, सासरे, दोन नणंद व मावस सासू अशा एकुण सहा जणांविरुद्ध ठाणे अंमलदार शेख फेरोज, पो.शि. मोहन महामुने यांनी (Gangakhed Crime) गुन्हा दाखल केला. याचा पुढील तपास बिट जमादार संतोष व्यवहारे करीत आहे.