अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला
परभणी/गंगाखेड (Gangakhed Crime) : बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या ज्ञानोबा मुगाजी कऱ्हाळे उर्फ माऊली महाराज मुडेकर (Mauli Maharaj Mudekar) यांनी अटक टाळण्यासाठी गंगाखेड अप्पर जिल्हा सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. दि. २० ऑगस्ट मंगळवार रोजी यावर सुनावणी घेत न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे माऊली महाराज मुडेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
गंगाखेड मालेवाडी रस्त्यावरील गंगोत्री आश्रमाचे प्रमुख असलेल्या ज्ञानोबा मुगाजी कऱ्हाळे उर्फ माऊली महाराज मुडेकर (Mauli Maharaj Mudekar) यांनी २०२१ मध्ये शहरातील एका पंचवीस वर्षीय विवाहितेवर आश्रमात अत्याचार करून तिच्या घरी जाऊन विनयभंग केल्याची व पिडीतेच्या पतीसोबत सुद्धा अनैसर्गिक लैंगिक कृत्य केल्याची फिर्याद दिल्याने नुकताच गंगाखेड पोलीस ठाण्यात विविध कलम अन्वये (Gangakhed Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या ज्ञानोबा मुगाजी कऱ्हाळे उर्फ माऊली महाराज मुडेकर (Mauli Maharaj Mudekar) यांनी अटक टाळण्यासाठी गंगाखेड अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीन घेण्यासाठी अर्ज दाखाल केला असता न्यायाधीश डी. डी. कुरुळकर यांनी आरोपीच्या वकिलांचे तसेच पिडितेची बाजू मांडणाऱ्या सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकून घेत आरोपांचे स्वरूप, गंभीरता व फिर्यादीत नमूद केलेल्या घटनेच्या व्हिडिओ क्लिपचा विचार करून या (Gangakhed Crime) गुन्ह्याचा सविस्तर तपास होणे आवश्यक असल्याचे नमूद करून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे ज्ञानोबा मुगाजी कऱ्हाळे उर्फ माऊली महाराज मुडेकर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलल्या जात आहे.