परभणी/गंगाखेड (Gangakhed Crime) : रात्र गस्तीवर असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर व चालक शिवाजी बोमशेटे यांना मिळून आलेल्या संशयीत दुचाकी चोराकडून गंगाखेड पोलीसांनी (Gangakhed Police) सात दुचाकी जप्त केल्या आहेत.
गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दित गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना (Gangakhed Crime) लक्षात घेऊन दुचाकी चोरांचा शोध घेण्याकरिता जिल्हा पोलीस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, गंगाखेड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाणे स्तरावर पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, सपोनि आदित्य लोणीकर, स.पो.उप.नि. युसुफ पठाण, पो.हे.कॉ. मारोती माहोरे, चालक शिवाजी बोमशेटे यांचे पथक स्थापन करून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या असता दि. जुलै रोजी रात्री रात्र गस्तीवर असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर, चालक शिवाजी बोमशेटे यांना रवि दिगांबर वाघमारे रा. लेक्चर कॉलनी गंगाखेड हा या संशयीत तरुण दुचाकीसह मिळून आल्याने व सदर दुचाकी चोरीची असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यास चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेवुन सपोनि आदित्य लोणीकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यसुफ पठाण, (Gangakhed Police) पोलीस हवालदार संतोष व्यवहारे, चालक शिवाजी बोमशेटे, चालक पांढरे, पोलीस शिपाई परसराम परचेवाड आदींनी रवि दिगंबर वाघमारे व त्याच्या इतर दोन अल्पवयीन बालकांकडे सखोल विचारपुस करून त्यांच्या ताब्यातून विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या अंदाजे २७५००० रुपय किंमतीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.