परभणीतील गंगाखेड ते कोद्री येथील सुरळवाडी शिवारात असलेल्या कॅनलच्या दरीत आढळला
परभणी/गंगाखेड (Gangakhed Dead body) : आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पोखर्णी वाळके येथील तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह (Dead body) दि. १३ सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गंगाखेड ते कोद्री रस्त्यावरील सुरळवाडी शिवारात असलेल्या कॅनलच्या खोल दरीत आढळला आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलीस (Gangakhed Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड तालुक्यातील पोखर्णी वाळके येथील विठ्ठल भगवान परकड वय ३० वर्ष हा तरुण दि. ६ सप्टेंबर रोजी पासून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी दि. ८ सप्टेंबर रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. दि. १३ सप्टेंबर शुक्रवार रोजी गंगाखेड ते कोद्री रस्त्यावर शहरापासून जवळच असलेल्या सुरळवाडी शिवारातील कॅनलच्या अंदाजे शंभर फूट खोल दरीत कुजलेल्या अवस्थेत इसमाचा (Dead body) मृतदेह असल्याची माहिती दुपारी ३ वाजेच्या सुमारास मिळाल्याने पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक रामधन डोईफोडे, पोलीस हवालदार संभाजी शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाचे कर्मचारी बोलावून शेख रशीद यांच्या हायड्राला लोखंडी खाट बांधून अमजद खान पठाण, शेख शकील शेख रफिक यांना कॅनलच्या खोल दरीत सोडून मृतदेह बाहेर काढत महातपुरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करून जागेवरच शवविच्छेदन करत (Dead body) मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
याप्रकरणी मारोती सदाशिव परकड वय २९ वर्ष रा. पोखर्णी वाळके यांनी दिलेल्या खबरीवरुन (Dead body) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. याचा पुढील तपास (Gangakhed Police) पोलीस उपनिरीक्षक रामधन डोईफोडे हे करीत आहेत.